Header Ads

Kalyan Loksabha: कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीस

 Kalyan Loksabha: कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीस

Kalyan Loksabha: कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार : देवेंद्र फडणवीसभाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekbath Shinde) यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होईल. आम्ही महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष त्यांना निवडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला देऊ नयेत, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती. मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गणपत गायकवाड काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच, वैशाली दरेकर यांच्याकडून जोमात प्रचार केला जातोय. 

सौजन्य साभार झी २४ तास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.