Header Ads

MahatmaPhule: महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली-विशाल खैरे

 विकास सोशल फाउंडेशन व विशाल खैरे मित्र मंडळच्यावतीने अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारक पाउलं टाकत समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली- विशाल खैरे


MahatmaPhule: महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली-विशाल खैरे

    अहमदनगर (प्रतिनिधी)  - रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर महापुरुष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले होय. मराठी मातीनं ज्या असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला, त्यांपैकी महात्मा जोतिराव फुले यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठी  क्रांतिकारक पाउलं टाकत समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ 19 व्या शतकातच  महाराष्ट्रात  समाजसुधारक जोतिरावांनी रोवली होती. त्यांच्या क्रांतीकारी निर्णयाने समाजसुधारणेचे युग सुरु झाले, समाज शिक्षित होऊन आपल्या हक्कासाठी लढू लागला. त्यांचे समाजपरिवर्तनाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन विशाल खैरे यांनी केले.     विकास सोशल फाउंडेशनच्यावतीने स्वीट कॉर्नर चौक, विरुंगळा मैदान शेजारी आगरकर मळा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. 


याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, विशाल खैरे, सुरेखा खैरे, दत्ता गाडळकर, विजय गायकवाड,प्रशांत मुथा, सुरेश लालबागे, कुंडलिक गदादे, आदेश गायकवाड, यश शर्मा, यशवत खैरे, विजय घासे, पंडित खुडे, नितीन मेहेत्रे, देविदास मेहेत्रे, प्रणव कटारिया, संजय गाडीलकर, सफल जैन,संजय गाडीलकर, सूर्या विशाल खैरे,भागवत कुरधने आदीसह कार्यकते उपस्थित होते.     यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, ज्योतिबांच्या समाजसुधारणा या केवळ चार-दोन क्षेत्रासाठीचे नव्हत्या तर समाजात जेथे जेथे अन्याय दिसतो आहे, अज्ञान दिसत आहे, त्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य सुरू केले. अज्ञानाविरुद्ध लढा देताना अनाथ बालके, विधवा स्त्रिया, कुमारी माता, अस्पृश्य जनता अशा सर्वांना घेऊन सज्ञानी आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे महान कार्य केले, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.     अशोक आगरकर, शिवाजीराव ससे, ज्ञानेश्वर कविटकर, दत्तात्रय फुलसौंदर, श्रीधर नांगरे, विशाल गाडीलकर,  राजेश लाळगे, संजय आंबेकर, अशोक वाव्हळ, विजय साळुंखे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.