Header Ads

Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण

  Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण

Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण



अहमदनगर (प्रतिनिधी)  : उसणे दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली. चेतन शशीकांत अग्रवाल (वय ३१ रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मंगलगेट परिसरात सचिन जाधव याच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.


मारहाणीत जखमी झालेल्या चेतन यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारा दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सचिन जाधवसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १४) 


गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तुकाराम जाधव (रा. रामचंद्र खुंट), प्रेम काळे, प्रशांत काळे, अभिजित तांबडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


चेतन यांनी सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी सचिनला वाळवणे गावातील यात्रेच्या दिवशी उसणे पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी चेतन हे सचिनच्या मंगलगेट येथील कार्यालयात १२ मे रोजी दुपारी गेले होते. 


चेतन यांनी पैशाची मागणी केली असता सचिनने शिवीगाळ करून चार लोकांत पैसे मागतो का? असे म्हणून मारहाण केली. धारदार वस्तूने डोयात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रेम, प्रशांत व अभिजित यांनी देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल


लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी (१२ मे) मंगलगेट येथे दोन गटांत हाणामारीची घटना घडली होती. यात जखमी झालेले सचिन जाधव यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना बातमीसाठी मोबाईलमध्ये चित्रिकरण करत असलेल्या पत्रकाराला सचिन जाधव व त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. 


मोहमंद हसन इदरीस सय्यद (वय २० रा. मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. 

त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी दिलेल्या जबाबावरून सचिन जाधवसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.