Header Ads

Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

 भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला  विजयी करा-सचिन जाधव


Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये  डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न

 


        
अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले. 


          महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पुढाकारातून  प्रचार फेरी काढण्यात आली होती.  त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपाचे  शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते,बंटी ढापसे,सुनील भिंगारे,गजेंद्र राशीनकर प्रिया जानवे,रेणू करंदीकर,अनिता दिघे,बाबासाहेब सानप,


अनिल निकम,ओंकार  शिंदेपोपट पाथरे,आनंदराव शेळके,अनिल सबलोक,बाळासाहेब भुजबळ,सुरेखा विद्ये आदिंसह भाजपा,शिवसेना,मनसे,आप आदी महायुतीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. 


          प्रचारफेरीची सुरुवात कोंडयामामा चौकातून झाली रामवाडी,गोकुळवाडी,कौलारू कॅम्प,सर्जेपुरा,शिपिगल्ली, वंजारगल्ली  परिसरातील मध्ये फिरून   सांगता झाली. 


Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये  डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.