Header Ads

Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची कन्सेप्ट कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड

 Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची कन्सेप्ट कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड

Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची कन्सेप्ट कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड     अहमदनगर (प्रतिनिधी)  - वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज. पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर मधील कन्सेप्ट फार्मास्युटिकल कंपनीत अंतिम परीक्षेपुर्वीच चांगले पॅकेजवर  नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये ऋषिकेश संगपाल, ज्ञानेश्वरी सांगडे, निखिल घोरपडे, आयन पटेल, प्रिया चोथे, अमन शेख, अल्तमस शेख आणि दत्तात्रय चौधरी यांचा समावेश आहे.


     मुलाखतीपूर्वी कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुलाखतीला कसे सामोरे जावे, कोणते प्रश्न विचारले जातात, सध्याची कंपन्यांची परिस्थिती असे विविध स्तरावर विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात आली होती.  तसेच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केल्याचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरीसाठी झाला.


     अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच उत्तम पॅकेज असलेल्या नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. प्रसाद घुगरकर व प्रा. मोहसीन शेख  यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


     यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  विनय पाउलबुद्धे, रामभाऊ बुचकूल, नम्रता जगधने, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे,  साई पाऊलबुद्धे, श्रद्धा पाऊलबुद्धे, रघुनाथ कारमपुरी,


 बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण आदींसह  शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.