Ahmednagar Fataka: दि अहमदनगर फटाका व्यापारी असो.चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर

 दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर

Ahmednagar Fataka: दि अहमदनगर फटाका व्यापारी असो.चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकरअहमदनगर (प्रतिनिधी)  -दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर पदी गजेंद्र राशीनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर खाली झालेल्या उपाध्यक्ष पदी सुरेशशेठ जाधव बिनविरोध निवड करण्यात आली तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष पदी गणेश परभणे तर सह सेक्रेटरी पदी अरविंद साठे व कार्याध्यक्ष पदी शिवराम भगत यांची फेर निवड सर्वानुमते करण्यात आली.

कार्यकारणीच्या झालेल्या मीटिंग मधे सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांनी सन 2023-2 4 चे जमा खर्चाचा हिशोब वाचून दाखविला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली या वेळी अध्यक्ष सुरेश जाधव यांनी त्यांच्या खाजगी अडचणी मुळे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तो सर्वानुमते मंजूर केला व रिक्त झालेल्या जागी गजेंद्र राशीनकर यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 तर खाली झालेल्या उपाध्यक्ष पदी सुरेशशेठ जाधव बिनविरोध निवड करण्यात आली तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष पदी गणेश परभणे तर सह सेक्रेटरी पदी अरविंद साठे व कार्याध्यक्ष पदी शिवराम भगत  यांची फेर निवड सर्वानुमते करण्यात आली.

या वेळी मा. अध्यक्ष सुरेश जाधव यांनी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली म्हणून सर्व सभासदांचे आभर मानले. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, माझी सर्व सदस्यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली या बद्दल मी सर्वांचा ऋणी असून या पुढील काळात असो चे भरीव कार्य करून आणखी नावारूपास आणण्याचा माझा मानस आहे. सर्व सभासदांना न्याय मिळण्याचा मी प्रयत्न करेल असे म्हणाले.


शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र राशीनकर व उपाध्यक्ष सुरेश जाधव यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेवटी आभार असो. चे सह सचिव अरविंद साठे यांनी मानले.

या वेळी असो चे कार्यकारिणी सदस्य शिरीष चंगेडे, अनिल टकले, संतोष तोडकर, राजूशेठ छल्लानी, निखिल परभाने, संजय जंजाळे, विकास पटवेकर, अमोल तोडकर, उमेश क्षीरसागर, मयूर भापकर, रमेश बनकर व संजय सुराणा आदि उपस्थित होते.

Ahmednagar Fataka: दि अहमदनगर फटाका व्यापारी असो.चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर Ahmednagar Fataka: दि अहमदनगर फटाका व्यापारी असो.चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर Reviewed by Darshak on जून ०७, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Sport

adv/http://www.moglands.blogspot.com|https://2.bp.blogspot.com/-FX6wgRQZy7w/WqJHjVMDmDI/AAAAAAAADgM/6t0GeI0vZWsxIrADWxHmyJjhrUoC2o0BQCLcBGAs/s1600/adv2-magazine.jpg
Blogger द्वारे प्रायोजित.