Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद

 
 Dr Paulbudhe College:निसर्गाचा समतोल पर्यावरणवर अवलंबून -प्राचार्य बोर्डे

Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद

    अहमदनगर (प्रतिनिधी)   - आपल्या गरजा भागवितांना मानवाला निसर्गाचा फायदा होतो. निसर्गावर आधारित पर्यटन वाढीला पोषक वातावरण तयार करणे मानवाच्या हातात असते. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी निसर्गाची साथ आवश्यक असते. निसर्गाचा समतोल हा पर्यावरणावर अवलंबून असतो, त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य बाळासाहेब बोर्डे यांनी केले.


     नारायण डोह येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे पॉलिटेक्निक महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘दोन मुले.. एक कुंडी..’ उपक्रमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, चंद्रकांत ढाकणे, राजेंद्र देशपांडे, श्रीकांत गागरे, निलेश निर्मळ, सागर बोठे, जाबीर अली, सुदर्शन लोखंडे, जयश्री होले, शशिकला देवकर, स्वाती बोरा, रेखा रोटे, सुरेखा निमसे आदि उपस्थित होते.


     या उपक्रमासाठी संस्थेचे साई पाउलबुधे यांनी 250 कुंड्या व झाडे विद्यार्थ्यांना दिले. यामध्ये दोन मुलांनी एक झाडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. सर्वच विद्यार्थ्यांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.


     प्राचार्य बोर्डे यांनी यावेळी पर्यावरण व मानवी स्वास्थ्या याबाबत मार्गदर्शन करुन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याने पॉलिटेक्निक कॉलेजची गुणवत्ता वाढत आहे. कॉलेज परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्वांची आहे. त्यामुळे आता 250 कुंडयांमधील वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर दिली, ती उत्साहाने स्विकारुन पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ते पार पाडतील असे त्यांनी सांगितले.


     यावेळी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी पर्यावरणसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पर्यावरण दिनानिमित्त डॉ.ना.ज.पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये सध्या प्रथम वर्षाच्या मुलांसाठी सुविधा केंद्र उपलब्ध केले असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांसह पालकांनाही होत आहे


Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद Reviewed by Darshak on जून १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Sport

adv/http://www.moglands.blogspot.com|https://2.bp.blogspot.com/-FX6wgRQZy7w/WqJHjVMDmDI/AAAAAAAADgM/6t0GeI0vZWsxIrADWxHmyJjhrUoC2o0BQCLcBGAs/s1600/adv2-magazine.jpg
Blogger द्वारे प्रायोजित.