Header Ads

Ahmednagar Crime: फिरोदियांच्या घरी चोरी करणारा गजाआड ; 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत

 Ahmednagar Crime: फिरोदियांच्या घरी चोरी करणारा गजाआड ; 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत 

Ahmednagar Crime: फिरोदियांच्या घरी चोरी करणारा गजाआड ; 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत



Ahmednagar Crime:  अहमदनगर  :  शहरातील माणिकनगरमधील डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 33 लाखांचे 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात राहुरीतील दीपक सर्जेराव पवार (वय 32, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) याला अटक करण्यात आली आहे.


डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी 23 आणि 28 आॅक्टोबरच्या दरम्यान चोरी झाली होती. डाॅ. फिरोदिया यांच्या घराच्या कपाटातील 55 तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू असे दागिने चोरीला गेला होते. डाॅ. ऋषभ फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांसह चोरीच्या घटनास्थळी 4 ते 5 वेळा तपासणी केली. सीसीटीव्हीची तपासणी सुरू होती.


तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला तपासाच्या पुढच्या सूचना केल्या. यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवार भोवती सापळा आवळला.


दीपक पवार याला राहुरी बसस्थानक परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक पवार सुरूवातीला काहीच सांगत नव्हता. दिशाभूल करत होता. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता चोरी केलेले बरेच सोने हे घरी असून काही सोने सेलू परभणी येथील 2 सराफाला विकल्याचे त्याने कोतवाली पोलिसांना सांगितले. 

कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपक याच्या घरातून सुमारे 33 लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने एकूण वजन 828 ग्रॅम निव्वळ सोन्याचे 550 ग्रॅम जप्त केले आहे. दीपक पवार याला न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


3  सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे दीपक पवार भोवती संशय बळावला 

दीपक पवार याने सराईतपणे चोरी केली होती. या चोरीची उकल करण्याचे आव्हान होते. तांत्रिक तपासात सुरूवातीला धागेदोरे मिळत नव्हते. परंतु बारकाईने तपास केल्यावर 3  सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे दीपक पवार भोवती संशय बळावला. यासाठी कोतवाली पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील 70 ठिकाणचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासले. यानंतर दीपक पवार याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. दीपक पवार हा कुत्रा विकत घेण्यासाठी आला आणि त्याचवेळी कोतवाली पोलिसांनी त्याला राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.