Header Ads

Dindi: अहमदनगर-गोंदवले पायी दिंडीचे 15 रोजी प्रस्थान

 Dindi: अहमदनगर-गोंदवले पायी दिंडीचे 15 रोजी प्रस्थान
भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

Dindi: अहमदनगर-गोंदवले पायी दिंडीचे 15 रोजी प्रस्थान भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन



    Dindi: अहमदनगर (प्रतिनिधी)  - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सालाबाद प्रमाणे यंदाही नगर ते गोंदवले पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दिंडीचे प्रस्थान वसंत टेकडी, शिलाविहार येथून सकाळी 7 वाजता होणार आहे. तरी ज्या भाविकांना दिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी विजय मते (9225322389) संपर्क साधावा असे आवाहन दिंडी चालक सुंदरदास रिंगणे यांनी केले आहे.


     श्री संतचरणरज छगन महाराज व हभप धनंजय महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत हा दिंडी सोहळा साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच गोंदवले ते पंढरपूर पायी दिंडी जाणार आहे. ही दिंडी नगरमधून कायनेटिक चौक, दौंड मार्गे बारामती, फलटण, दहिवडी गावातून गोंदवलेपर्यंत जाणार आहे. या दिंडीत दानशूर व्यक्तींनी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मुक्काम अशी सोय केली आहे.


     या दिंडीचे स्वागत वृत्तपत्र विक्रेते श्रमिक संघटनेचे वतीने करण्यात येणार असून काही आर्थिक मदत दिंडीसाठी श्री.व सौ. रिंगणे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. तरी विक्रेत्यांनी पहिल्या दिवशी कायनेटिक चौक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश गांधी, संजय गोरे, प्रमोद पंतम, शरद बेरड आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.