Header Ads

Nishedh Sabha: निर्भय बनो'चे विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधाची सभा संपन्न

 Nishedh Sabha: निर्भय बनो'चे विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधाची सभा संपन्न

Nishedh Sabha: निर्भय बनो'चे विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेधाची सभा संपन्नअहमदनगर(प्रतिनिधी): येथील सकल भारतीय समाज अहमदनगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर आरएसएस, बजरंग दल आणि भाजपाच्या गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शहीद भगतसिंग स्मारकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. विद्या जाधव-शिंदे या होत्या. यावेळी लोकशाहीवादी पक्ष संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑल इंडिया युथ फेडरेशन, भारताचा क्रांतिकारी पक्ष, बहुजन शिक्षक संघटना, आरपीआय, संभाजी ब्रिगेड आदींसह समविचारी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास डॉ. प्रशांत शिंदे, निसार पठाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सभेला सुरूवात झाली.

कृषी व समाजाभ्यासक आनंद शितोळे आपल्या मनोगतात म्हणाले की, नव्याने जिंकलेली तीन राज्ये, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, पैसे, तपास यंत्रणा, प्रशासन, केंद्रात असणार पाशवी बहुमत एवढं सगळं असूनही यांना सामान्य लोकांची एवढी भीती वाटते की साधं बोलणं होऊ देत नाहीत सभेत ? कारण यांना ठाऊक आहे, रोजगार, शेती, अर्थव्यवस्था या सगळ्यावर उभ्या राहणाऱ्या प्रश्नांवर उत्तर नाहीयेत आणि मुद्दे खोडून काढता येत नाहीत म्हणून गुद्दे वापरायचे पण या लोकांना सांगणे आवश्यक आहे, हिंदी कवी गोरख पांडेय यांची कविता, वे डरते हैं, किस बात से डरते हैं, तमाम गोला बारुद, पुलीस साथ होणे के बाद भी, क्यू की एक दिन गरीब निहाथे लोक इनसे डरना बंद कर देंगे.

ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष फिरोज शेख म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी निर्भय बनो चळवळीची बैठक अहमदनगरमध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे झाली या बैठकीमध्ये विश्वंभर चौधरी, असीम सरोदे प्रमुखस्थानी होते. या राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहे. जर चळवळीची सुरुवात जेंव्हापासून झाली आहे चळवळीचा उद्देश अभिव्यक्ती स्वतंत्र व लोकशाही कशी वाचेल आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर जी हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केंद्राच्या भाजप सरकारने सुरू केला आहे त्याच्या विरोधात बोलण्यासाठी व लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका सुरू आहे. ही बैठक जेंव्हापासून सुरू झाले तेंव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच चौधरी यांच्यावरील हा हल्ला आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे व पुढेही ही चळवळ जोमानाने सुरू राहील असा निर्धार करण्यात येत आहे. या चळवळीमध्ये दिवसेंदिवस लोकांची वाढ होत आहे. लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपले अभिव्यक्ती स्वतंत्र वाचवण्यासाठी या निर्भय बनो सोबत जास्तीत जास्त जुळून जागरूक नागरिक होण्याचा संदेश द्यावा.

आम आदमी पार्टीचे रवि सातपुते म्हणाले, जातीयवादी शक्तींनी जो काही धुडगूस घातला व विश्वंभर चौधरी यांचा माईक फेकून देण्यात आला आणि त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे भाषण बंदीचा अवलंब करून त्यांना जी धक्काबुक्की करण्यात आली त्याचा सर्व सामाजिक स्तरातून निषेध करण्यात येत आहे. ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं बुद्धिवंत काम करतात त्या त्यावेळेस फॅसीझम म्हणजेच मनुवादी लोक या लोकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करतात परंतु कितीही त्यांनी नामोहरण करण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले प्रमाणे सत्यशोधक समाजाचे काम या ठिकाणी निर्भिग्नपणे पुढे पुढे चालतच राहील चालतच राहील. हा हल्ला विश्वंभर चौधरींवर नसून हा संविधानावर हल्ला आहे आणि हा हल्ला येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने त्या हल्ल्याचे उत्तर दिलं जाईल.

भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे अशोक सब्बन म्हणाले, हजारो वर्षांच्या इतिहासात या देशामध्ये भारतीय संविधानाने आम जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. अभिव्यक्तीची जपणूक करण्याची जबाबदारी ही शासन व प्रशासनावर आहे, पण आपण पहात आहोत आज ही सत्य मांडणारे विचार समाजापर्यंत पोहचू दिले जात नाही. सत्य विचार मानसिकरित्या गुलाम केलेल्या जनतेला समजली व तो विचार करू लागला तर तो स्वतंत्र भूमिका घेवून गुलामी झटकून टाकेल व समाजामधील आमचे भ्रष्ट मार्गाने मिळालेल्या स्थालाला धक्का दिला जाईल. जनतेला त्यांच्या हक्क अधिकाराची जाणिव होवून तो मानसिकगुलाम राहणार नाही. या रीतीच विचार समाजात जावू नये या साठी सततच या प्रतिगामी शक्तींनी हिंसाचाराचा वापर केला. हिंसाचार जेवढा हिंस्त्र होतो तेवढा त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची निकड जास्त होते. प्रा.विश्वंभर चौधरी याच्यावर झालेला भ्याड हल्ला हा विचाराचा सामना करू शकत नसल्यामुळेच झाला. याचा जाहीर निषेध करून यापुढे कार्यकत्यांनी अधिक जोमाने अभिव्यक्ती स्वतंत्र आबाधित राखण्यासाठी रचनात्मक व संघटनात्मक कार्य वाढवावे. त्यासाठी कृती कार्यक्रम आखावेत. त्यात सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घ्यावे असे आवाहन केले.

निर्भय बनो'चे हेरंब कुलकर्णी म्हणाले, विश्वंभर चौधरी बोलताना त्यांच्यासमोरचा माईक खेचून फेकून देण्यात आला. ही कृती प्रतिकात्मक आहे. हे सरकार जे जे विरोधात बोलेन त्यांचे आवाज बंद करत आहे. संसद, न्यायालय, निवडणूक आयोग, प्रामाणिक अधिकारी यांचा आवाज क्षीण करण्यात आला आहे. एकाधिकारशाही करताना विरोध सहन होत नाही. आज झालेला हा हल्ला भविष्यात आपल्यावरही होऊ शकतो हे लक्षात घेवून पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकमेकांना धरून राहत संघटन उभे करण्याची गरज आहे व त्यात मध्यमवर्गीय बुद्धिजीवी जोडण्याची गरज आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संजय झिंजे म्हणाले, विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध. विश्वंभर चौधरींवर जो हल्ला झाला असे हल्ले आता येथून पुढे वारंवार होत राहणार आहे कारण हल्लेखोरांना पूर्ण खात्री झालेली आहे आपले कुणीच काही करू शकत नाही. म्हणून येथुन पुढे आपणच आपले संरक्षण करण्यासाठी ढाल सेना निर्माण केली पाहिजे जसे ढालीचे काम वार रोखण्यासाठी असते तेच काम समाजामधील विश्वंभर चौधरी सारख्या चळवळीतील नेत्याचे संरक्षण करतील व चौधरींसारखे महाराष्ट्रातील अनेक चळवळीतील नेते आपले विचार समाजापर्यंत मांडतील कारण की हल्लेखोरांना विश्वंभर चौधरीसारख्या चळवळीतील नेत्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचूनच द्यायचे नाही आहे म्हणून आपणच आता महाराष्ट्रामध्ये ढाल सेना निर्माण केली पाहिजे हल्लेखोरांची हिंमत झाली नाही पाहिजे चळवळीतील काम करणाऱ्या नेत्यावर व कार्यकर्त्यावर हल्ले करण्याची.

बहुजन शिक्षक संघटनेचे प्रा. विलास साठे यांनी व्यापक एकजूटीचे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे म्हणाले, सांस्कृतिक गुंडगिरीविरूध्द सर्व समाजाने एकजुट होणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी सर्वांना सोबत घेऊन लढणारा पक्ष असून आपल्यासोबत सदैव असेल.

अविनाश साठे, ऋषिकेश गुंडला यांनी मनोगत व्यक्त केले.

निषेध सभेसाठी संध्या मेढे, श्याम असावा, संतोष गायकवाड, बापू चंदनशिवे, सोम पोकळे, तुषार सोनवणे, अतुल महानोर, हनीफ शेख, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी प्रस्तावना संध्या मेढे यांनी तर आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.