Header Ads

Sant Nirankari: महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम होणार नागपूर नगरीत


Sant Nirankari: पुर्वतयारीच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ : नगर झोनचे सेवादलाचा सहभाग


Sant Nirankari:  महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम होणार नागपूर नगरीत


     Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी)  -  निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राचा 57 वा वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि. 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान सुमठाणा (नागपूर) येथील विशाल मैदानांवर होणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांती सुखाने परिपूर्ण करत विश्वबंधूत्व, शांतीचा कल्याणकारी संदेश समागमाद्वारे जनमानसापर्यंत पोहविण्याचा उद्देश आहे.

     या भव्य आध्यात्मिक समागम सोहळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवेचे विधिवत उद्घाटन आ.मोहन छाबडा (मेंबर इंचार्ज प्रचार-प्रसार,सं.नि.मं.) यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी मंडळाचे मुंबई, दिल्ली येथील पदाधिकारी, सेवादल अधिकारी व महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो भक्तगण, सेवादल सदस्य उपस्थित होते.

     उल्लेखनिय आहे की, भव्य रुपात आयोजित करण्यात येत असलेल्या या संत समागामाच्या पुर्वतयारीसाठी समागम सेवांमध्ये स्वेच्छेने सहभाग घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरांमधील निरंकारी सेवादलाचे महिला व पुरुष सदस्य व अन्य भक्तगणांच्या तुकड्या टप्प्या टप्प्याने जाऊन सेवा देतील. नगर झोन मधील विविध शाखांमध्ये 500 हून अधिक सेवादल सदस्यांचा तुकडी सध्या तेथे कार्यरत असून, स्थानिक सेवादलच्या सोबतीने तेथील अत्यावश्यक सेवांच्या तय्यारीमध्ये नि:स्वार्थ भावनेने सेवा देत आहेत, जेणे करुन समागमात येणार्‍या श्रद्धाळू, भाविक, सज्जनांच्या स्वागतासाठी, त्यांच्या सुख-सोईसाठी केले जात असून, जेणेकरुन त्यांना समागमाच्या अद्वैत परमोच्च, दैवी सुखाचा अनुभव घेता येईल.

     उल्नलेखनिय आहे की, महाराष्ट्राच्या वार्षिक संत समागमांची परंपरा जुनी आहे. त्यात सलग 52 वर्ष मुंबईतील विविध मैदानांवर कार्यक्रम होत. 2020 मध्ये नाशिक येथे 53 वा समागम झाला. नंतर कोरोनामुळे दोन वर्ष र्व्हच्युअल स्वरुपात समागम पार पडले. 56 वा छत्रपती संभाजीनगर येथे मागील वर्षी झाल्यानंतर यंदा नागपूर नगरीला 57 वे समागम अयोजनाचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.

     आ.छाबडाजी यांनी शेवटी सांगितले की, अशा प्रकारच्या संत समागमांचे आयोजन सद्गुरुंच्या दिव्य दृष्टीकोनानुसार मानवाला मानवाशी जोडण्यासाठी केले जात असते. मनुष्य जेव्हा आपले नाते ईश्वराशी जोडतो, तेव्हा तो सहजपणे समस्त भेदभावांच्या पालिकडे जातो व सुंदर जीवन जगून धरतीसाठी सुद्धा एक वरदान बनून जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.