Header Ads

Ahmednagar Shivsena: पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे - अनिल शिंदे

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या उपप्रमुखपदी राजू जहागिरदार

Ahmednagar Shivsena: पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे - अनिल शिंदे
     अहमदनगर (प्रतिनिधी) -    शिवसेना शिंदे गटाच्या नगर शहर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जहागिरदार यांची नियुक्ती करुन त्यांना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, हानजर खान, सरफराज खान, इरफान जागीरदार, तारीख कुरेशी, हबीब शेख, तसलीम शेख, सद्दाम शेख, सय्यद समाद, परमेश शेख, इमरान शेख, अब्रारार शेख, आजीज शेख आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू जहागिरदार व हानजर खान यांनी नुकताच मुंबई येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश होता.


     याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने काम करत आहेत. जनतेची कामे व्हावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यांचा अनेकांना लाभ होत आहे. सर्वांना न्याय देण्याच्या भुमिकेतून शिवसेनेचे काम होत असल्याने अनेक लोक शिवसेनेशी जोडले जात आहेत. 


नगरमध्येही शिवसेनेची ताकद वाढत आहे. कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे. राजू जहागिदार यांचे सामाजिक क्षेत्रात चांगले काम आहे, मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्यावर शिवसेना उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येत आहेत. ते या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शिवसेनेचे काम अधिक प्रभावीपणे करतील, असा विश्वास व्यक्त केला.


     नियुक्तीनंतर राजू जहागिदार म्हणाले, शिवसेना हा पक्ष नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्पर आहे. त्यामुळे पक्षावर लोकांचा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मोठी प्रगती करत आहे. पक्षाने आपणावर जी जबाबदारी दिली, ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडू. युवकांचे संघटन करुन नगर शहरात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करु. तसेच शासनाच्या योजनांना लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करुन शिवसेनेचे ध्येय-धोरणे जनसामान्यापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली.


     याप्रसंगी सचिन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या धडकेबाज निर्णयामुळे सर्व घटकांना  दिलासा मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्यातही अनेक युवक शिवसेनेशी जोडले जात आहे. राजू जहागिरदार यांचे जनसामान्यांशी चांगला संपर्क असल्याने शिवसेना वाढीसाठी मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.