Header Ads

Satkar: द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अंजलीताईंचे व्याख्याने मार्गदर्शक - संजय देवळालीकर

 उप जिल्हाधिकारी सौ.अंजलीताई धानोरकर यांचा लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट च्यावतीने सत्कार

Satkar: द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अंजलीताईंचे व्याख्याने मार्गदर्शक - संजय देवळालीकर




     अहमदनगर (प्रतिनिधी)  - आज धावपळीच्या युगात मनुष्याला नाते टिकविणे अवघड झाले आहे. करिअरच्या मागे लागल्याने कुटूंब, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सौ.अंजलीताई यांचे व्याख्याने हे मार्गदर्शक ठरत आहेत.




कुटूंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. जबाबदारीची नोकरी सांभाळून   जनजागृती करणारा उपक्रमातून कुटूंब व्यवस्था मजबूत होईल, असे प्रतिपादन लाड सुवर्णकार समाज ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवळालीकर यांनी केले.




  छत्रपती संभाजी महाराज नगर उपजिल्हाधिकारी सौ.अंजलीताई धानोरकर या अहमदनगर मध्ये भगवान महावीर व्याख्यानमालेसाठी आल्या असता त्यांचा लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष संजय देवळालीकर, प्रकाश  देवळालीकर, मुकुंदराव निफाडकर, सुरेश मैड, शरदराव कुलथे. सचिन देवळालीकर आदि उपस्थित होते.



     याप्रसंगी सौ.अंजलीताई धानोरकर म्हणाल्या, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी कुटूंब, मित्र यांची महत्वाची भुमिका असते. जीवनात सकारात्मकता ठेवून आपले कार्य करत राहिले पाहिजे. लाड सुवर्णकार समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजोन्नत्तीचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. सुदृढ समाजनिर्मितीसाठी हे आवश्यक असल्याचे सांगून ट्रस्टच्या कार्याचा गौरव करुन पुढीलवेळी ट्रस्टच्या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.


     मुकुंद निफाडकर यांनी लाड सुवर्णकार समाज ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.