Header Ads

Ahmednagar AAP: निलेश लंकेंच्या प्रचारासाठीच्या आम आदमी पार्टी उतरली मैदानात

हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन प्रचार करतील : भरत खाकाळ


Ahmednagar AAP:  निलेश लंकेंच्या प्रचारासाठीच्या आम आदमी पार्टी उतरली मैदानात




अहमदनगर (प्रतिनिधी )  : कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्वासन नको. नगर शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे. हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघर जाऊन संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे प्रतिपादन आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आप पक्ष देखील आता लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. 


लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. खाकाळ यावेळी म्हणाले, आज नगर हे खड्ड्यांचे शहर झाल आहे. टॅक्स भरून देखिल मुलुभूत सुविधा सुद्धा मिळत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी शहराला सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळे मतदारांमध्येच परिवर्तनाची भावना निर्माण झाली आहे. निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे. 


राणीताई लंके म्हणाल्या, लंके हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आम्ही साधी माणसं आहोत. मात्र सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे, विकासाची दृष्टी ठेवून काम करणे, गरजवंताच्या हाकेला धावून जाणं यामुळेच पारनेरकरांसह महाराष्ट्रातील जनतेने अल्पावधीत लंके यांना भरभरून प्रेम दिल. लंके यांचे खासदार होणं म्हणजे सर्व मतदारांनी खासदार होणं असं आहे. 


किरण काळे म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खोट्या गुन्ह्यातून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हुकुमशाही आहे. नगर शहरात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते इंडिया आघाडीचे घटक पक्ष या नात्याने लंके यांच्या प्रचारा करिता सक्रिय झाले आहेत. त्याचे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करीत आहोत. आगामी काळात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन विरोधकांचा राजकीय आखाड्यात सुपडा साफ करण्याचे काम केले जाईल. नागरिकांना त्यांच्या मनातील काम करणारे सरकार त्यांच्याच पाठिंबाने देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. 


या वेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, आपचे जिल्हा प्रवक्ता ॲड. महेश शिंदे, आपच्या महिला अध्यक्ष ॲड. विद्या शिंदे, उपाध्यक्ष संगीता खिलारी, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, सिताराम खाकाळ, नितीन लोखंडे, देवदत्त साळवी, आपच्या कला संस्कृती आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, 

व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र सामल, युवा आघाडी अध्यक्ष अनिल साळवे, रिक्षा आघाडी उपाध्यक्ष  विजय लोंढे, महासचिव दिलीप घुले, सचिव सचिन एकाडे, साक्षीताई जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, 

काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, अजय मिसाळ, किशोर कोतकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींसह आप व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.