Header Ads

धर्माच्या मार्गावर चालल्याने मानवी जीवन हितकारक - हभप प्रसाद देव

 ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात राम जन्मोत्सव साजरा

धर्माच्या मार्गावर चालल्याने मानवी जीवन हितकारक  - हभप प्रसाद देव




    अहमदनगर (प्रतिनिधी) -   आज माणसाच्या नैतिक अध:पतनाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कोणतीही अपराधी भावना न बाळगता आपण आपल्या दुर्गुणांचे गुलाम बनत चाललो आहोत. माणूस म्हणून जन्म घेण्याचे सौभाग्य लाभले असताना आत्मपरिक्षण करुन आपले दोषांवर मात करावा. 


धर्माच्या मार्गावर चालावे, त्यामुळेच मानवी जीवन हितकारक होईल, प्रत्येक व्यक्तीमत्व राम समाविष्ट आहे, तो पहाण्याचा प्रयत्न करावा, असे निरुपण हभप प्रसाद देव यांनी केले.


     सावेडी उपनगरात शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी हभप प्रसाद देव, सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे, सेवाभावी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


     रामजन्मावर हभप प्रसाद देव यांनी निरुपण करतांना सांगितले की, सयंम आणि प्रामाणिकपणे सतत केलेल्या प्रयत्नांनी आपण आपल्या अंतकरणातील राम जागृत करु शकतो. 


आजच्या रामनवमीला रामाचा जन्म होऊ द्या. त्या रामाची नैतिक मुल्ये आपल्या जीवनात सजवण्याचा प्रयत्न करुन रामभक्त आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आपण हे सिद्ध करु त्या दिवशी रामलल्लाच्या मुर्तीचे सौंदर्य हजरोपटीने प्रकाशमय होऊन अधिक खुलून दिसेल, असे त्यांनी सांगितले.


     या रामजन्म सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.