Header Ads

हनुमान जयंतीनिमित्त बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

 हनुमान जयंतीनिमित्त बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

हनुमान जयंतीनिमित्त बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ   अहमदनगर (प्रतिनिधी ) - शहरातील बागडपट्टी येथील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बागडपट्टी येथे पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख प्रदीप वाव्हळ यांनी सकाळी पुजा-पाठ करून भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.  रात्री महाप्रसादाचे (भंडारा ) आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.


     दिलदार सिंग (बीर) यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जात असतात. रक्तदान शिबिर व वह्या पुस्तके वाटप व गोरगरिबांना मदत करणे असे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असतात.


     याप्रसंगी दिलदारसिंग बीर म्हणाले, श्रीराम भक्त हनुमान हे ब्रह्मचर्य, बलोपासना, चरित्र्यवान, रामभक्त, आदर्श सेवक या गुणांमुळे बजलरंगबली संपूर्ण जगात वंदनीय, आदरणीय, पुजनीय मानले जातात. अशा अविरत कार्याचे प्रत्येक व्यक्तीला स्मरण व्हावे म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्य राबविले जात आहेत. भव्य महाप्रसादाचा लाभ घेऊन भविक तृप्त झाल्याचे समाधान असल्याचे सांगितले.


     याप्रसंगी कार्याध्यक्ष अजय दराडे, उपाध्यक्ष किरण डफळ, सचिव कुणाल गोसके, खजिनदार वरुण मिस्कीन, कार्यवाह किशोर लगडे बबलू राजपूत, सुरेश म्याना, सचिन म्हस्के, शंकर कंदी,  सचिन नराल, सोमनाथ लगडे, गणेश म्याना, राजू कोडम, जगदीश चिलवर, प्रशांत विद्ये, 


राजू म्याना, पप्पू टोणे, अभिषेक वाव्हळ, सतीष बल्लाळ, महेश सब्बन, सुजित म्याना, हरी बल्लाळ, विनायक गोसके, अमोल डफळ, सुमित गोसके, प्रथमेश संभार,अरविंद साखरकोटा, प्रितेश डफळ, रमेश, विनायक सोन्नीस, मयुर चिलवर, योगेश विद्ये, रोहित म्याना, लालू सुपेकर, ओम संभार, नवनीत गुरप, प्रथम सिंग, शंभु पाचारे, रत्नम नराल, पृथ्वी बिडकर, संकेत जक्कल, स्वराज वाव्हाळ, चेतन सुराणा आदिंसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नियोजन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.