Header Ads

Devendra Fadanvis: पहा व्हिडीओ ! वहिनींना कोणी थांबवू शकत नाही ; सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis: पहा व्हिडीओ ! वहिनींना कोणी थांबवू शकत नाही ; सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




पुणे :  बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. कांचन कूल पासून ते नवनाथ पडळकरदेखील आहे. त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी मागील 25 वर्ष बारामतीचा विकास केला. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आज बारामतीचं जे रुप आहे ते अजित पवारांमुळे आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही.ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही आहे. ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे.  देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. 


बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो, हेच या निवडणुकीत पाहणं महत्वाचं असणार आहे. घड्याळ, धनुष्णबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या. ते मत नरेंद्र मोदींना जातं आणि दुसरं कोणतंही मत राहुल गांधींना जातं. त्यामुळे मत कोणाला द्यायचं आहे. हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा निर्णय आता तुमचा असल्याचंही ते म्हणाले. 


मोदींनी मागील 10 वर्षात केलेला विकास आपण बघितला.20 कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात मोदींनी आणलं आहे. तरुणांसाठी मोठी मदत केली आहे. महिलांना मोठी मदत केली आहे. देशात मोठे उद्योदक तयार झाले पाहिजे म्हणून मोदी प्रयत्नीशील आहेत. बाराबलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.