Header Ads

Satkar: मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत -प्रमोदकुमार छाजेड

 मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत -प्रमोदकुमार छाजेड

Satkar: मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत -प्रमोदकुमार छाजेड



     अहमदनगर (प्रतिनिधी)  - स्वत:चा उद्योग, व्यवसाय सांभाळून गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना समाज सेवा म्हणून मोफत होमिओपॅथी उपचार व औषधे देऊन मानव सेवेत, ईश्वरीय सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत. या सेवेत पत्नी निता नारंग साथ देत आहेत. महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत आज सर्वसामान्यांना उपचार घेणे अवघड होत आहे, अशा परिस्थितीत जसपाल नारंग गरजूंना मोठा आधार ठरत आहेत. त्यांच्या हातून अशीच जनसेवा व्हावी, अशी आशा प्रमोदकुमार छाजेड यांनी व्यक्त केली.



     सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक येथे जसपाल नारंग मोफत होमिओपॅथी उपचार करुन समजसेवा करत असल्याबद्दल त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित केल्याबद्दल स्नेह-75 ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निता नारंग, प्रमोदकुमार छाजेड, ईश्वर सुराणा, बाळासाहेब रेणाविकर, नारंग परिवार उपस्थित होता.


     जसपाल नारंग सत्कारास उत्तर देतांना म्हणाले, समाजात वावरताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून हे आरोग्य सेवेचे काम करत आहे. होमिओपॅथी उपचारामुळे अनेक रुग्णांना चांगला फायदा होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपण ही सेवा करत आहोत. 


आपल्या कार्याची दाखल एस.एस.ए. युनिर्व्हसिटी पोर्टलॅड,यूएसए द्वारे होमिओपॅथी आणि सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल स्नेह-75 ने आपला सत्कार करुन या कार्यास प्रोत्साहनच दिले असल्याचे सांगितले.


     स्नेह-75 च्या वतीने नारंग यांचा केलेला हा सत्कार आम्ही विसरु शकणार नाही, असाच स्नेह त्यांनी ठेवावा, असे निता नारंग यांनी आभार व्यक्त करतांना म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.