Header Ads

Sitaram Sarda Vidyalay: पुस्तक दुकानदार, ग्रंथालय चालकांचा सत्कार करून पुस्तक दिन साजरा

 

 सीताराम सारडा विद्यालयातील शिक्षकांचा उपक्रम

Sitaram Sarda Vidyaपुस्तक दुकानदार, ग्रंथालय चालकांचा सत्कार करून पुस्तक दिन साजरा



     अहमदनगर (प्रतिनिधी)  - जागतिक पुस्तकदिनी सीताराम सारडा विद्यालयाच्यावतीने नगर शहरात वाचन संस्कृती रुजवणार्‍या पुस्तक दुकानदार, सार्वजनिक ग्रंथालयांचे ग्रंथपाल यांचा सत्कार करून व पुस्तक भिशीत शिक्षकांनी पुस्तक भिशित पुस्तके खरेदी करून पुस्तक दिन साजरा केला.


     यावेळी उदय बुक स्टॉलचे विवेक कुलकर्णी, अभिरुची वाचनालय चळवळ चालवलेले शिरीष बापट, ललित बुक स्टॉलचे मनोहर लांडगे, अहमदनगर जिल्हा  वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, शाळेचे चेअरमन मकरंद खेर उपस्थित होते.


     समाज म्हणून आपण या ग्रंथ प्रसार करणार्‍या व्यक्ती व संस्थाविषयी कृतज्ञ असायला हवे यासाठी हा सन्मान करत आहोत असे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.


     याप्रसंगी शाळेत सुरू असलेल्या पुस्तक भिशी उपक्रमात भिशी लागलेल्या 6 शिक्षकांना प्रत्येकी 3600 रुपयांची पुस्तके वितरीत करण्यात आली. वर्षभर शाळेत सुरू असलेल्या पुस्तक वाचन उपक्रमाने आम्ही शिक्षक म्हणून समृध्द झालो अशी भावना शिक्षक रविंद्र चोभे व शीतल शिंदे यांनी व्यक्त केली.


     अध्यक्ष शिरीष मोडक यांनी पुस्तक दिनाच्या निमित्ताने केलेला सत्कार अभिनव असून  पुस्तके समाजात पोहोचवणे हे महत्वाचे योगदान असल्याचे सांगून विल्यम शेक्सपियर ची माहिती सांगितली. ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा व शाळेचे चेअरमन मकरंद खेर यांनी पुस्तक भिशी उपक्रमाचे कौतुक करून वाचन महत्वाचे असल्याचे सांगितले.


शिरीष बापट व अमोल इथापे यांनी सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करून पुस्तके पोहोचवण्याचे केलेले प्रयत्न सविस्तर सांगितले.


     सूत्रसंचालन नितीन केणे यांनी केले. शाळेत एकही दिवस रजा न काढता वर्षभर कार्यरत असलेल्या सुजाता खामकर यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.