Diwali Ank 2023: दिवाळी अंकातून तेजोमय विचारांचा दिपोत्सव - अशोक गाडेकर

Darshak
0

 Diwali Ank 2023: अहमदनगर जिल्हा वाचनालयात दर्जेदार दिवाळी अंकाचे वाचकांना वितरण

Diwali Ank 2023: अहमदनगर जिल्हा वाचनालयात दर्जेदार दिवाळी अंकाचे वाचकांना वितरण

     Diwali Ank 2023:  अहमदनगर (प्रतिनिधी) - दिपावलीच्या आंदोत्सवात लख्ख विचारांची, वाचनाचा दिपोत्सव खर्‍या अर्थाने मानवी मानाला समृद्ध करतो. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे वाचन संस्कृतीची व दिवाळी अंकाची द्विशतकी वाटचाल करणारी चळवळ अव्याहतपणे चालविली आहे. तमाम नगरकर वाचकांसाठी ही गोष्ट अभिमानाची व दिवाळी अंकाच्या वाचनातून तेजोमय विचारांचा दिपोत्सव साजरा करणारी ठरो हीच सदिच्छा. दिवाळी अंकाच्या या ऐतिहासिक परंपरेत जिल्हा वाचनालयाने पुढील वर्षी ‘आजिवा’चा दिवाळी अंक प्रकाशित करुन जिल्ह्यातील असंख्या साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले.


     अहमदनगर जिल्हा वाचनालयात दरवर्षी प्रमाणे याही विक्री नामवंत दिवाळीअंकाचे वितरण जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर लंके, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तन्वीर खान, संचालक प्रा.मेधा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, राहुल तांबोळी, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते.     याप्रसंगी सुधीर लंके म्हणाले, तरुण पिढी आता पुन्हा पाट्यावरचा मसाला व चुलीवरच्या भाकरीकडे वळली आहे. त्याचप्रमाणे ते माहिती तंत्रज्ञानाच्या युगात साहित्याकडेही वळत चालली आहे. त्यांनी गरज आहे, ती बदलत्या काळातील विषय व त्यामधील संदर्भ सत्यता. दिवाळी अंकातून ही चळवळ अधिक व्यापक होईल, असा आशावाद व्यक्त केला.


     प्रास्तविकात प्रा.शिरिष मोडक यांनी ऐतिहासिक जिल्हा वाचनालयातील उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिवाळी अंकाची मेजवाणीचा नगरकर रसिक वाचकांनी घेऊन विचारांची दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प रसाळ यांनी केले तर आभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

     याप्रसंगी जाहिरातदारांचा सन्मान वाचनालयाच्या संचालक मंडळाच्यावतीने  करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक महेश देशमुख, प्रांजली एंटरप्रायझेसचे नंदकुमार आढाव, प्रसाद तांदुळवाळकर, ग्लोबलचे अतुल नरसाळे, अभिजित भळगट, अविनाश रसाळ, मनोज मुनोत, तसेच वाचक, वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top