Header Ads

Hazrat Zabardast Urs: हजरत जबरदस्त-जबरहट दर्गा यांचे संदल-उरुस आनंद देणारा - नगरसेवक बाळासाहेब बोराटे

 Hazrat Zabardast Urs: दरवर्षी सामाजिक जातीय एकतेचे दर्शन

Hazrat Zabardast Urs: हजरत जबरदस्त-जबरहट दर्गा यांचे संदल-उरुस आनंद देणारा - नगरसेवक बाळासाहेब बोराटे



   Hazrat Zabardast Urs: अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील गौरवनगर-फकीर वाडा परिसरातील शेकडो वर्षांपासून जागृत पिरस्थान व हजारो हिंदू-मुस्लिम समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जबरदस्त-जबरहट रहे. दर्गा संदल-उरुस च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन पहावयास मिळते. हा उत्सव मनाला आत्मिक समाधान आनंद देणारा असल्याचे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.


        यावेळी दर्गा प्रमुख मुजावर शेख जमीर इस्माईल मिस्री, यादे हुसैन आलम कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान, विशाल वालकर, मौलाना असगर अली, मुजावर मुनीर जमीर शेख, जावेद जमीर शेख, अशपाक शेख, इंजि.इम्रान खान, शब्बीर शेख, समीर शेख, जाधव मंडपवाले, नासीर खान, शेख मोहम्मद रफीक, शाकीर शेख आदीं उपस्थित होते.


       हजरत जबरदस्त-जबरहट रहे.दर्गा यांचे संदल उरुस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असते. यामधे अन्नदान सर्वश्रेष्ठ दान नुसार दोन दिवस भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. संदल निमित्ताने खिचडा (हलीम) तर दुसरे दिवशी उरुसमधे मसुर भात, शाकाहारी पदार्थ जबरदस्त जबरहट दर्गाचे खादिम शेख जमीर इस्माईल मिस्री यांचे विशेष प्रयत्नांतुन बनविण्यात येत असल्याचे यादे हुसैन आलम कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान  यांनी सांगितले.


     महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे सोयीसुविधा होणे गरजेचे असुन नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे विशेष लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील असे हाजी अन्वर खान पत्रकार यांनी सांगितले असता नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी समस्यांचे निराकरण करु असे आश्वासीत केले.


         नुकतेच संदल उरुस संपन्न झाले उरुसानिमित्ताने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दर्गा प्रमुख मुजावर शेख जमीर इस्माईल मिस्री यांनी सांगितले.


        यावेळी आलेल्या मान्यवर पाहुणेंच्या हस्ते दर्गा वर गलेफ, फुलांची चादर, सुवासिक अत्तर, लोबान चढविण्यात आले. मौलाना असगर अली यांनी फातेहा पठण केले. तसेच मान्यवरांचे फेटा, हार घालून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांचे शुभहस्ते भंडारा महाप्रसादाचे शुभारंभ करण्यात आले. अनेक हिंदू-मुस्लिम भाविकांनी भंडारा महाप्रसादाचे लाभ घेतले. महिलांची गर्दी लक्षणीय होती. संपूर्ण दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई जाधव मंडपवाले यांनी केली होती.


        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अन्वर खान पत्रकार यांनी केले तर आभार दर्गा मुजावर शेख जमीर इस्माईल मिस्री यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.