Header Ads

Ahmednagar BJP: ‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’ : खा. डॉ. सुजय विखे



 Ahmednagar BJP: तीन राज्यातील विजयाचा भाजपच्या वतीने सावेडीत जल्लोष

Ahmednagar BJP: ‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’ : खा. डॉ. सुजय विखे



Ahmednagar BJP: अहमदनगर:  भारतीय जनता पार्टीने चार पैकी तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून २०२४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील हे आज सिद्ध झाले आहे.


सर्व विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून छातीठोकपणे जे पंतप्रधान नरेद्र मोदींबद्दल वाईट बोलत होते त्यांना जनतेच चोख उत्तर दिले आहे. आतातरी त्यांनी मिडिया समोर न येत जनतेत जाऊन झालेल्या चुका सुधाराव्यात, अन्यथा २०२४ साली होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणर नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.


राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तिसगढ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्निवाद बहुमताचा जल्लोष सावेडीत भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. ढोल वाजवून, फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खा.सुजय विखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी महेंद्रभैय्या गंधे, ज्ञानेश्वर काळे, संगीता खरमाळे, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, रेखा विधाते, संतोष गांधी, राजू मंगलारप, गोकुळ काळे, संजय ढोणे, प्रताप परदेशी आदींसह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवून जनतेचा विश्वास भाजपवारच आहे हे सिद्ध केले आहे. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल आम्ही जिंकली आहे. आता २०२४ साली होणारी फायनलही आम्हीच जिंकू व नगरमधून डॉ.सुजय विखे यांना पुन्हा खासदार करू.


यावेळी कुसूम शेलार, अशोक जोशी, संपत नलावडे, अविनाश साखला, सचिन कुसळकर, नितीन जोशी, सुमित बटोळे, श्रीकांत फंड, ओमकार काळे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, बल्लू सचदेव, सतीश शिंदे, विजय गायकवाड, रियाज कुरेशी, विजय घासे, राहुल बुधवंत, व्यंकटेश बोमादंडी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.