Header Ads

Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे

Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे 

Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे


 ठाणे : भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपा सह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली.


लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत. मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही कुणाला घडवलं तर उत्तर मिळतं कुणालाच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून सगळी भाड्याची माणसं गोळा केली आहेत. “


बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी माणसं घडवली. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून माणसं भाड्याने गोळा केली आहेत. देवेंद्र फडणवीस जुगाड करण्यात पटाईत आहेत माणसं घडवण्यात नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत तर त्यांनी संपवली. 


 विनोद तावडेंना त्यांनी संपवलं, पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, एकनाथ खडसेंना त्रास दिला असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला. जे बाहेरुन घेतले होते अशांबरोबर त्यांनी काय न्याय केला? विनायक मेटेंना काय न्याय मिळाला? राजू शेट्टींबरोबर सदाभाऊ खोत का दिसत नाहीत? याचा विचार करा” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.