Header Ads

Ahmednagar Congress: काँग्रेसच्या मागणी नंतर गंज बाजारातील रखडलेल्या कामाला तात्काळ सुरुवात

Ahmednagar Congress: नालबंद खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्त्याचे ही काम सुरू करण्याची अलतमश जरीवालांची मागणी

Ahmednagar Congress: नालबंद खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्त्याचे ही काम सुरू करण्याची अलतमश जरीवालांची मागणी




अहमदनगर (प्रतिनिधी)  : मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या गंज बाजार परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याचे गढूळ पाणी येत आहे. मैला मिश्रित असणाऱ्या पाण्याला दुर्गंधी आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. कामे मंजूर असून देखील सुरू होत नव्हती. त्यामुळे शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देत तातडीने रखडलेली कामे सुरू करण्याची मागणी केली होती. मनपाने त्याची दखल घेत कामांना सुरुवात केली आहे. 

मंगळवारी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जरीवाला यांच्यासह प्रभागातील नागरिक, काँग्रेसने प्रभाग 11 मधील विविध कामे मार्गी लावण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्तांना देत लक्ष वेधले होते. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, 

अनिस चुडीवाला, फैय्याज शेख,उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, चंद्रकांत उजागरे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, अभिनय गायकवाड, आनंद जवंजाळ, इंजि. सुजित क्षेत्रे, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, गणेश चव्हाण, विजय चौथे, रियाज सय्यद, अक्षय भोसले, अजय रणसिंग, 

दर्शन अल्हाट, बिभीशन चव्हाण, समीर शेख, गौरव घोरपडे, आप्पासाहेब लांडगे, मुस्तफा शेख, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर बोरुडे, दीपक काकडे, बाबासाहेब वैरागळ, बापूसाहेब धिवर, रोहिदास भालेराव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जरीवाला म्हणाले, प्रभाग ११ मधील नागरी प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. जागोजागी कामे रखडलेली आहेत. गंज बाजारातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. 

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. नालबंद खुंट चौक ते पीरशहा खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्त्या तसेच पीरशहा खुंट चौक ते पिंजार गल्ली रस्त्याचे काम देखील गेले अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. 

या रस्त्यांनी ये जा करणे देखील धोक्याचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखील तातडीने काम सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने काँग्रेसने आयुक्तांकडे केली आहे. 


नगरसेवक गायब : 


अलतमश जरीवाला यांनी प्रभागातील नगरसेवक गायब झाले असल्याची टीका केली आहे. नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या मनपाशी निगडित अनेक समस्यांसाठी मदतीची गरज आहे. नागरिक सर्वात आधी प्रभागाच्या नगरसेवकांची संपर्क साधायचा प्रयत्न करतात. अनेक नगरसेवक तर फोनच उचलत नाहीत. 

फोन उचलला कर चाल ढकल करतात. मात्र काम करत नाहीत. मनपा कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात. यामुळे प्रभाग ११ मधील रस्ते, पाणी, गटारी, पथदिवे अशा मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असल्याची टीका जरीवाला यांनी प्रभागातील नगरसेवकांचे नाव न घेता केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.