Header Ads

Dr Paulbudhe College: आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक -डॉ.जाधव

 Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये एडस् सप्ताहाची सांगता

Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये एडस् सप्ताहाची सांगता    Dr Paulbudhe College:  अहमदनगर (प्रतिनिधी)  - आज समाजामध्ये एडस्बद्दल अनेक गैरसमज आहेत, या गैरसमजातून एड्स बाधिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. परंतु एचआयव्ही, एडस् सारख्या रोगाची माहिती व संसर्ग या विषयी समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही या विषयी अधिक माहिती घेणे गरजेचे आहे. 


आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने एडस्चे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या विषयी स्वत:बरोबरच इतरांमध्येही जागृती करावी जेणे करुन एडस्चे समुळ उच्चाटन करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.निलेश जाधव यांनी केले.


     वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक एडस् दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्या रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य निलेश जाधव,  डि.फार्मसीच्या प्राचार्या डॉ.अनुराधा चव्हाण, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


     याप्रसंगी अनुराधा चव्हाण म्हणाल्या, युवक-युवतीमध्ये एडस्बाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आहे. ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. एचआयव्ही, एडस् रोगा विषयी माहिती, संसर्ग याबाबत समाजामध्ये विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. एडस् बाधितांबाबत सहानुभुती बाळगली पाहिजे. या रोगाला हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.


     एडस् दिनानिमित्त आयोजित सप्ताहांतर्गत पोस्टर स्पर्धा, रॅलीचे आयोजन, विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी-शिक्षकांनी रेड रेबिनची मानवी प्रतिकृती तयार करुन व रेड रेबिन बांधून एडस् टाळण्याचे आवाहन करण्यात आले.  विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.