Header Ads

kirtan: कोरठण देवस्थानवरील आर्थिक भार कमी होणार!

 kirtan:  कोरठण खंडोबाला पुढील वर्षी ग्रामस्थ,भक्तातर्फे  चंपाषष्ठीला कीर्तन सप्ताहाचे आयोजन 


kirtan:  कोरठण खंडोबाला पुढील वर्षी ग्रामस्थ,भक्तातर्फे  चंपाषष्ठीला कीर्तन सप्ताहाचे आयोजन


 

                     अहमदनगर (प्रतिनिधी)  लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा  ता.पारनेर जि.अहमदनगर या तीर्थक्षत्रावर पुढील वर्षापासुन चंपाषष्टी उत्सवाला जोडून हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजनाची परंपरा कायम ठेवणेसाठी आणि देवस्थानवरील आर्थिक भार कमी करण्यासाठीग्रामस्थ,भाविकभक्त,पंगत अन्नदाते यांनी आता नियोजन करण्याचे ठरविले आहे. असे ग्रामस्थ व भक्त मंडळाच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे 


            यावर्षीं शनिवार दि.९ डिसेंबरला देवस्थानजवळ हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन देवस्थान विश्वस्त मंडळाने आर्थिक कारण देऊन बंद केल्याने ग्रामस्थ,पंगत अन्नदाते,सेवाभक्ती करणारे ग्रामस्थ भक्तांमध्येमोठी  नाराजी झाली आहे.सर्वांना कीर्तन सप्ताहाचे माध्यमातून देवाच्या चरणी होणा-या भक्ती हरिनामापासून वंचित रहावे लागले असल्याची तीव्र भावना व नाराजी पसरली आहे.


चंपापप्टीला जोडून चालत आलेली कीर्तन सप्ताहाची परंपरा कायम  ठेवणेसाठी पुढील वर्षापासून ग्रामस्थच्या वतीने देववस्थानजवळ हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजन नियोजन करण्यात येणार आहे.त्यामुळे देवस्थानचा आर्थिक भार कमी होईल आणि लोकसहभागतून सप्ताहाची अखंड परंपरा राहील.


                चंपाषष्टी हा  मार्तड भैरवाचा अवतार दिवस असून षडनवरात्र उत्सवाने चंपाषष्टी उत्सव साजरा होतो यापर्व काळात चालत आलेला कीर्तन सप्ताह नवीन विश्वस्त मंडळाने यावर्षी बंद  केल्याने ग्रामस्थ,भक्त,पंगत अन्नदाते यांचेमध्ये प्रचंड नाराजी आहे.गेली बारा वर्ष दरवर्षी चंपापष्टीच्या आगोदर काही दिवसांपासूनच कीर्तन सप्ताह नियोजनाची चाहूल व उत्सुकता सर्वांना लागते.परंतू यावर्षी सप्ताह प्रारंभ होण्याचा दिवस  उजडला तरी नियोजन नसल्याचे पाहून ग्रामस्थ नाराजी व संताप व्यक्त करीत आहेत. 


            चंपाषष्टीच्या अगोदर सुरू होणा-या कीर्तन सप्तहापासूनच मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व भक्तीमय वातावरणात यावर्षी खंड पडला असून सर्वत्र मुनमुने वाटत आहे.दरवर्षी चंपाषष्टी उत्सवात होणारा धार्मिक सत्संग व संतदर्शन सोहळा हा कार्यक्रम १८ तारखेच्या चंपाषष्टी उत्सवात नमूद नसल्याने भाविकभक्तांमध्ये नाराजी असून त्याचा परिणाम उत्सवावरती होण्याची शक्यता आहे.


            पत्रकावर गोपीनाथ घुलेदिनेश  डावखर ,बाबाजी  जगताप,बवन भिमाजी गायकवाडबबन  पुंडे,योगेश  पुंडे किसन  मुंढे,शिवाजी ढोमे,बन्सी  ढोमे ,मालोजी जगताप,रामचंद्र  घुले दिगंबर जगताप,सुदाम पांडुरंग पुंडे,शहाजी उमाजी शिंदे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.