Header Ads

Bhingar Cantonment: खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला भिंगारकरांचा विरोध

Bhingar Cantonment: नागरिकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय -सागर चाबुकस्वार


नागरिकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय -सागर चाबुकस्वार
    

Bhingar Cantonment: अहमदनगर (प्रतिनिधी)  - भिंगार कॅन्टोंमेंट बोर्डचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ठ करण्याच्या खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यांनी त्यांचे स्पष्टपणे मत प्रदर्शन सुद्धा करु दिले नाही. महानगरपालिका झाल्याने नगरकरांचे जे हाल होत आहे ते लक्षात घेता भिंगार आणि परिसराची नगर पंचायत करावी, असा स्थानिक नागरिकांचा सूर आहे, त्याचा खा.विखे यांनी आणि राज्य सरकारने विचार करावा, असे भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केली.


     भिंगार शहराचा नगर महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस भिंगारमधील नागरिक आणि छावणी परिषदेचे सदस्यही उपस्थित होते, पण भिंगारचे स्थानिक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. छावणी परिषदेकडून कसा त्रास दिला जातो, या विषयीची भावना मांडतांना विखे पाटील यांनी समावेशाचा प्रश्न विचारताच हात वर करुन संमती दर्शवली.


     भिंगारमध्ये रस्त्याचा प्रश्न कसा निर्माण झाला आहे? इथपासून तुंबलेल्या गटारी पथदिवे आणि उद्यानाचा वणवा यावरही सविस्तर भावना मांडल्या. भिंगारमधील स्थानिक नागरिक त्या दिवशी बोलायला उभे राहिले असल्यास त्यांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडू दिली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र स्वरुपाच्या भावना निर्माण झाल्या आहेत.


     नगरमध्ये अनेक भागांत आधीच पाण्याची बोंब आहे. मोकाट कुत्र्यांचा साधा प्रश्न सोडविता येत नाही. गटारींची अवस्था काय आहे, हे सांगायला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. केडगांवसह अनेक उपनगरात पुरेशा दाबाने पाणी मिळते का? असे एक ना अनेक प्रश्न नगरमध्येच असताना त्यातून काय वाचवून भिंगारला पाणी कसे देणार? मध्यंतरी  भिंगारने नगर महापालिकेकडून पाणी मागितले होते. अनेक दिवसांपासून प्रयत्न करुनही ते पाणी अजूनही देता आलेेले नाही. उद्या या संपूर्ण प्रश्नांची जबाबदारी महापालिकेचीच असेल, त्यावेळी काय होईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे.


     महापालिकेच्या तिजोरीत कायमच खडखडाट असतो, शहरातील विकास कामे करतांनाच त्यांच्या नाकीनऊ येतात, तर भिंगारच्या विकासासाठी कोठून निधी उपलब्ध करुन देणार? सुमारे 22 वर्षापुर्वी मनपात हद्दीत लगतच्या भागांचा समावेश झाला होता. परंतु आजही त्यातील बर्‍याच भागातील साधे रस्ते,पाणी,ड्रनेज, स्ट्रीट लाईट असे मुलभुत प्रश्न गेल्या 20 वर्षात मनपाला सोडविता आले नाही. त्यातीलच बुरुडगांव हे मनपात समावेशित होते, परंतु पुरेशा सुविधा अभावी त्यांनीही मनपातून बाहेर पडून पुन्हा ग्रामपंचायत केली. या सर्व गोष्टीचा विचार करता भिंगारचा समावेत अहमदनगर महानगरपालिकेत नको, अशी भिंगारकरांची भावना असल्याचे सागर चाबुकस्वार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.