Header Ads

Datta Jayanti MIDC: दत्तजयंती उत्सव मंगल दत्त क्षेत्रात आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती

  Datta Jayanti MIDC: दत्तजयंती उत्सव मंगल दत्त क्षेत्रात  आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती

Datta Jayanti MIDC: दत्तजयंती उत्सव मंगल दत्त क्षेत्रात  आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती



             Datta Jayanti MIDC: अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात दत्तजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला हे दत्त क्षेत्र पुरातन क्षेत्र असून शंकर महाराजांचे अनुयायी राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते सकाळी अभिषेक झाली नंतर श्री शंकर गीता या ग्रंथावर आधारित नवनाथ महाराज म्हस्के यांच्या श्री शंकरबाबा महाराज चरित्र कथाची सांगता व महाराजांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले  

       आ संग्राम जगताप यांच्या हस्ते दुपारी श्रीची महाआरती,पाळणा व जन्मोत्सव व पालखी मिरवणूक परिसरात काढण्यात आली नंतर  दर्शन सोहळा,भजन तसेच महाप्रसाद संपन्न झाला 

        आ जगताप म्हणाले हे स्थान पुरातन असून औदूंबर वृक्षाच्या ठिकाणी आहे गेली ४० वर्षे येथे दत्त जयंती उत्सव केला जातो जागृत व भक्ताना पावणारे ठिकाण म्हणून राज्यातून भाविक येथे येतात येथे मोठे मंदिर नाही पण औदूंबर आहे व राजाभाऊ कोठारी भक्ताना मार्गदर्शन करतात, 




जीवनात नापास झालेले अनेक लोक मी पहिले आहे जे या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी प्रगती केली आहे  ते पुढे म्हणाले दाह शमन करणारा दैवी वृक्ष औदुंबर अर्थात उंबर आहे नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे कडुनिंब, पिंपळ , वड व   उंबराचे अर्थात हिंदू धर्मात हे वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात.  जे या ठिकाणी मंगल भक्त क्षेत्रात आहे असेही ते म्हणाले 

          मठात श्रीगुरूचरित्र*पारायण संपन्न झाले त्याची सांगता झाली कार्यक्रमासाठी शहरांसह राज्यातून भाविक,भक्त मोठ्या संख्येने आले होते  सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते 

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.