Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात महिला दिन विशेष 'उत्तुंग आम्ही 'ला सुरुवात

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात महिला दिन विशेष 'उत्तुंग आम्ही 'ला सुरुवात

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात महिला दिन विशेष 'उत्तुंग आम्ही 'ला सुरुवातAhmednagar College: अहमदनगर- अहमदनगर महाविद्यालयातील महिला कक्षाच्या वतीने 'उत्तुंग आम्ही' या तीन दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ८ मार्च, जागतिक महिला दिनी, 'HER story: Breaking Chains, Building Empires हा मंत्रमुग्ध करणारा प्रथम भाग पार पडला.

      यामध्ये महिलांचा चुल-मुल ते सध्याच्या कॉर्पोरेट काळापर्यंतच्या प्रवासाचे स्वरूप विद्यार्थिनींनी संचलना द्वारे सर्व उपाधितांसमोर सादर केले. जुन्या काळात स्त्री चे आयुष्य हे चुल-मुल पुरतेच मर्यादित होते, परंतु सावित्रीबाईनी फुले यांनी ज्ञानाची ज्योत, पेटवून स्त्री जीवनातील अंधार संपवला आणि आज स्त्री देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलात तसेच विविध पद भूषवित देशाच्या कार्यात मोठे योगदान देत आहे, असे सर्व विद्यार्थिनींनी संचलनाद्वारे दाखविले. 

या संचलनात महिला क्रांतीचे नऊ काळ दाखविण्यात आले. यामध्ये चुल-मुल, सावित्रीच्या लेकी, सर्व कार्यक्षेत्रातील प्रथम महिला, सायकल चालवणाच्या काळ, लाठी-काठीने संरक्षण, भारतातील संरक्षण दल (NCC) संचलन, सर्व कॉर्पोरेट मध्ये कार्यान्वित असलेल्या महिला, बाईक चालवणाऱ्या सध्याच्या महिलांपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला.

     अहमदनगर महाविद्यालयाच्या यशाच्या कारकिर्दीत रूथबाई हिवाळे, मनोरमा बार्नबल, सरला बार्नबस यांचे मोठे योगदान महिला सक्षमीकरणात आहे. त्यामुळे संचलनाचा शेवट हा यांना आदरांजली वाहून करण्यात आला.

       या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर.जे. बार्नबस उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थिनींचे व सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. तसेच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला कक्षाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.