Header Ads

स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे - स्नेहल वेलणकर

 स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे - स्नेहल वेलणकर

स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे - स्नेहल वेलणकर



    अहमदनगर (प्रतिनिधी)  - आज समाजात  स्त्री पुरुषांचा बरोबरीने यशस्वीपणे वाटचाल करत असून, स्त्री शिक्षणाने त्यामध्ये अमुलाग्र असा बदल झाला आहे. स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे.   आज ती यशाची नवनवीत शिखरे पदक्रांत करीत आहे, असे प्रतिपादन स्नेहल वेलणकर यांनी केले.



     अहमदनगर महिला मंडळ दिल्लीगेट यांच्यातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्योती केसकर, स्नेहल वेलणकर, गौरी मुळे, छाया घोटणकर, अस्मिता शहा, निरुपमा देशपांडे, पुष्पा चिंताबर, शुभदा गोडबोले, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमलता सोनग्रा उपस्थित होते.



     यावेळी महिला मंडळाचावतीने आदर्श मातेचा पुरस्कार स्नेहल वेलणकर यांना देण्यात आला. यावेळी महिलांसाठी पाककला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लबचे डॉ.किर्ती कोल्हे, डॉ.श्रेया खासगीवाले, अल्पना शहा उपस्थित होते. रोटरीच्यावतीने  मंडळाचे बालक मंदिर शाळेला सॅनिटरी पॅड मशिन देण्यात आले. पाककला स्पर्धेचा बक्षिस वितरण प्रायोजक भारती गुंदेचा यांच्यातर्फे करण्यात आले.



     मंडळाचा अध्यक्षा ज्योती केसकर यांनी आपल्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याची आज गरज आहे. यासाठी मराठी माध्यमांचा शाळांचे महत्व वाढावे, असे सांगितले.


     यावेळी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार महिला मंडळाचा अध्यक्षा ज्योती केसकर यांनी केले.  कार्यक्रमास महिला मंडळाची सर्व कार्यकारिणी सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा देशपांडे यांनी केले तर आभार पुष्पाताई चितांबर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.