Header Ads

Ahmednagar History: गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं

 गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं

गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं



अहमदनगर (प्रतिनिधी) : गुगल इंडिया प्रा.लि या कंपनीने खोडसाळ करून अहमदनगर हे नाव बदलून गुगल ॲप वर अहिल्यानगर असे नाव 13 मार्च नंतर बदल केले होते अजून केंद्र शासनाने कोणतेही मान्यता दिली नसताना किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना परस्पर नाव बदलण्यात आले होते.


 त्याबाबत गुगल कडे समाजसेवक शाकीर शेख यांनी ईमेल द्वारे तक्रार करून तत्काल अहमदनगर नाव न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे इशारा दिला होता.  त्याची दखल घेऊन 26 मार्चला अहमदनगर हे नाव पुन्हा गुगल ॲप वर टाकण्यात आलेले आहे परंतु गुगलने खोडसळपणा केल्याबद्दल या कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी दिनांक 26 मार्च रोजी सचिव सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे  तक्रार केली.

 गुगलचे मुंबई शाखेचे व्यवस्थापक यांना सदर निवेदनाची प्रत देऊन गुगलने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. 


 गुगल इंडिया प्रा. लि. या कंपनी ने गुगल मॅप वर दि. १३ मार्च नंतर अहमदनगर या नावाच्या ठिकाणी अहिल्यानगर असे नाव नमूद करुन देशभरातील व परदेशातील नागरिकांची दिशाभुल केली आहे व त्यामुळे मोठया प्रमाणात प्रवाशींची गैरसोय झालेली आहे. मी सदर बाबत कंपनी चे ई-मेल आयडी वर दि. २५ मार्च २०२४ रोजी तक्रार केल्यानंतर कंपनी ने दि. २६ मार्च पासून अहमदनगर हे नाव गुगल मॅप वर प्रसिध्दी केलेले आहे.


परंतु सदरचा प्रकार कंपनी कडून खोडसळ पण्याने करण्यात आलेला आहे.मा.मुंबई उच्च न्यायालयाकडील रिट पिटीशन क्र. ३८८१/२०२३ मध्ये आदेश दि. २० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद व औरंगाबाद या जिल्हयाचे नामांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना जाहिर झालेली नसताना प्रारुप अधिसूचना च्या अनुषंगाने विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाने नामांतर केलेले नाव वापरण्यास सुरुवात केले होते.


त्याबाबत मा.उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेवून शासनास आदेश केले होते की, जो पर्यंत पुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडत नाही व अंतिम निर्णय होत नाही. तो पर्यंत पुर्वीचेच नाव वापरणे कायदेशीर बंधनकारक केलेले होते.असे असताना गुगल कंपनी ने 


अहमदनगर बाबत कोणतेही कायदेशीर प्रक्रिया किंवा अंतिम अधिसूचना झालेली नसताना अहमदनगर च्या ठिकाणी अहिल्यानगर गुगल मॅप वर प्रसिध्दी करुन प्रवांशीची व नागरिकांची गैरसोय केल्याबाबत


 गुगल इंडिया प्रा.लि कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई होवून या पुढे असे खोडसळ पणा करु नये या करिता शासनस्तरावरुन योग्य ते सदर कंपनीला निर्देश देण्यात यावे असे दिलेल्या तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.