Header Ads

Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ; ३९ जागांची पहा लिस्ट

 Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीरनवी दिल्ली:  काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी ३९ जणांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून यात राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत.


केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख पुढील आठड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. राहुल गांधींसह पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नावाचा समावेश आहे. ते राजनांदगावमधून निवडणूक लढवतील.

 दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली.

Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.