Header Ads

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित
New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित



नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या काही लोकांशी एका पोलिस कर्मचाऱ्याने चुकीचे वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ज्यात पोलिस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्यांना लाथा मारून बाजूला करतोय. दिल्लीतील या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आल्यानंतर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या घटनेवरून काँग्रेस पक्षाने भाजपवर हल्ला चढवला. काँग्रसचे खासदार इमरान प्रतापगढी यांनी व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीका केली.

 नमाज अदा करताना लाथा मारणाऱ्या हा पोलिस जवान माणुसकी विसरला वाटते. हा कोणत्या प्रकारचा द्वेष आहे. दिल्ली पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

 घटनेचा व्हिडिओ आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांचे गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई केली. डीसीपी (नॉर्थ) मनोज मीणा यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केले. तसेच डीसीपींनी पोलिसांनी शांतता राखावी असे आवाहन देखील केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.