Header Ads

Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

  Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी



अहमदनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दि.२८ मार्च २०२४ रोजी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण भगवेमय झाले होते.


शहरासह केडगाव उपनगर, भिंगार, ग्रामीण भागातही सकाळपासून विविध तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. चौका-चौकात स्टेज उभारून जयंती साजरी करण्यात आली. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे उभारले होते. पोवाडे, गीते अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.


शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्यास खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणला.


प्रारंभी जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकात अभिवादनसाठी ठेवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सर्वांचे लक्ष वेधले. नागरिकांसह युवक-युवती पुतळ्याबरोबर छायाचित्र घेण्यास गर्दी केली होती.


शहर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने माळीवाडा शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भाजपाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.