Header Ads

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेची नेप्ती गावात मतदार जागृती फेरी

 संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेची नेप्ती गावात मतदार जागृती फेरी

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेची नेप्ती गावात मतदार जागृती फेरी


     अहमदनगर (प्रतिनिधी)  -कल्याण रोड, ड्रिमसिटी मागील स्वकूळ साळी हितसंवर्धक मंडळ लक्ष्मी नारायण शिशू शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेच्यावतीने नेप्ती गावातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. याप्रसंगी सरपंच संजय जपकर, माजी जि.प.सदस्य अरुण होळकर, उपसरपंच दादू चौघुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदि उपस्थित होते.



     यावेळी मुख्याध्यापिका कल्पना भामरे लोकसभा निवडणूक अंतर्गत मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाविषयी ग्रामीण भागात निरुत्साह आहे, तो दूर व्हावा, मतदानाचे महत्व आणि कर्तव्य या विषयी जागृती करण्यात आली असल्याचे सांगितले.



     याप्रसंगी सरपंच संजय जपकर म्हणाले, मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे जरुरी आहे. आज कनोरे प्रशालेने गावातून फेरी काढून मतदारांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती केली आहे. आमच्या गावातून 100 टक्के मतदान घडवून आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.



     या जनजागृती फेरीत फलक घेऊन विद्यार्थी तयार केले होते. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी नेप्ती परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या फेरीची ग्रामपंचायत कार्यालयासमोर सांगता झाली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी 100 टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमासाठी प्रशालेच्या शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.