Header Ads

Ahmednagar BJP: भाजप नेते वसंत लोढा यांच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात निलेश लंके आले आणि...


 हनुमान चालीसाला आ लंके आले व लगेच निघून गेले 

Ahmednagar BJP: भाजप नेते वसंत लोढा यांच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात निलेश लंके आले आणि... अहमदनगर (प्रतिनिधी)

       शहरांमध्ये विविध ठिकाणी ४१ दिवस हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ते सादर करणारी ५ मंडळे आहेत रोज वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन प्रतिष्टीत मंडळी किंवा नगरसेवक व मंडळ करत असते   नुकत्याच एका मंडळाचा हनुमान चालीसा चा कार्यक्रम चालू होता, याठिकाणी लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आ निलेश लंके आले व कार्यक्रमात बसलेमात्र यावेळी चलबिचल झाली,संयोजकांनी त्याच्याशी चर्चा केली व २ मिनिटातच ते दर्शन करून निघून गेले असे काय झाले कि महाविकास आघाडीचे अनेक नेते येथे उपस्थित असताना ते लगेच गेले याची चर्चा शहरात आहे         मात्र समजलेली माहिती अशी कि आनंदी बाजार मध्ये सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्ट व  भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांच्या वतीने आयोजन केले होते.दरवर्षी प्रमाणे सर्व पक्षीय नेते,नगरसेवक या कार्यक्रमाला आले होते,यामध्ये जेष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दादाभाऊ कळमकर,शिवसेनेचे संभाजी कदमदत्ता जाधव,बाळासाहेब बोराटे,संजय गेनप्पा,भाजपाचे भय्या गंधे,प्रिया जानवे,तुषार पोटे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय चोपडा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते


 

            नेमके कार्यक्रम मध्यावर आल्यावर आ निलेश लंके आले व कार्यक्रमात बसले,यावेळी वसंत लोढा त्याचाशी बोलले व ते लगेच निघून गेले,यावेळी ऐकीव माहिती अशी कि लोढा त्यांना म्हणाले आमदार साहेब  आपले  संबंध आहेत पण सध्या दिवस निवडणुकीचे आहे आपण उमेदवार आहेत,येथे राजकारण नको म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या खा विखेना पण बोलवले नाहीयातून वेगळा संदेश जाईल,यावर आ लंके म्हणाले चुकीची माहिती मिळाल्याने मी येथे आलो असे म्हणून ते दर्शन करून लगेच गेले. बहुतेक दुसरीकडील हनुमान चालिसा ला जाण्याऐवजी ते या कार्यक्रमात आले असावे   मात्र या घटनेचे दबक्या आवाजात महाविकास आघाडी व महायुतीचे नेते कार्यकर्ते चर्चा करत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.