Header Ads

Indorikar Maharaj: आजच्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी : इंदुरीकर महाराज

सावेडी मध्ये  संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न


Indorikar Maharaj: आजच्या  पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी : इंदुरीकर महाराज



        अहमदनगर (प्रतिनिधी) -आजच्या व येणाऱ्या  पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी असून ते रुजविण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असते वारकरी संप्रदाय खूप महान असून त्याचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे.ज्ञान देव आहे व देव ज्ञान आहे  देव भेटायची गोष्ट नसून ती अनुभवाची गोष्ट आहे.


उपवास व पारायण करून देव भेटत नाही सावतामाळी,गोरोबा कुंभार,संत जनाबाई देवाकडे गेले नाही  तर देव त्यांना भेटायला आले होते,त्यांचे कर्म चांगले होते आपणही चांगले कर्म करा देव आपल्याला कोणत्याना ना कोणत्या रूपात भेटेल असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांनी केले.


       सावेडी मधील महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने समाज प्रबोधनकार  इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,अभय आगरकर,संदीप महाराज खोसे,शिवाजी चव्हाण


मा.उपमहापौर अनिल बोरुडे,माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर,दिलीप भालसिंग,बाबासाहेब सानप,संगीता खरमाळे,मोहन मानधना,अक्षय वाकळे,प्रिया जानवे,दुतारे महाराज,वंदना ताठे,पल्लवी जाधव,रेणुका करंदीकर,छाया रजपूत,लतिका पवार,नितीन शेलार  आदिसह मोठ्या संख्नेने भाविक वर्ग उपस्थित होते.


       सध्य परिस्तिथीवर वर हि त्यांनी परखड मत व्यक्त केले,बाबासाहेब वाकळे यांनी प्रास्ताविक केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.