Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महावि‌द्यालयातील रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील नामांकित कंपनीमध्ये निवड

 Ahmednagar College: अहमदनगर महावि‌द्यालयातील रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील नामांकित कंपनीमध्ये निवड

अहमदनगर महावि‌द्यालयातील रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील नामांकित कंपनीमध्ये निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ.भा.पा. हिवाळे यांची अपार जिद्द, अतूट ध्येयनिष्ठा, अथक परिश्रम व अभंग शिक्षणप्रेम यातून साकार झालेले स्वप्न म्हणजे अहमदनगर कॉलेज. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील लोकांपर्यंत उच्चशिक्षण कसे नेता येईल, हा त्यांचा जीवनध्यास बनला. त्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांनी २० जून १९४७ रोजी अहमदनगर कॉलेजची स्थापना केली व तेव्हापासून महाविद्यालय मानवी गुणांवर महत्व देऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवून विद्वत्ता आणि ज्ञान देण्याचे काम अविरतपणे करत असते.


      दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे. बर्नाबस यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश टाक, मार्गदर्शक प्रा. संदीप रोहोकले , प्लेसमेंट समन्वयक प्रा.श्रुती गुंजाळ व रसायनशास्त्र विभागाचे सर्वच प्राध्यापकांनी थेरी व प्रात्यक्षिक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन करून सराव करून घेतला, त्यामुळे हैदराबाद येथील साई लाईफ सायन्स आणि इंटोनेशन रिसर्च लॅबोरेटरी या नामांकित आणि दर्जेदार कंपनीमध्ये R&D व AR&D या विभागांमध्ये प्रशिक्षण रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी M.sc Organic and Drug Chemistry च्या 20 वि‌द्यार्थ्यांची निवड झाली आहे.


 साई लाईफ सायन्स मधील मुलाखतीमध्ये अभिषेक कासार, वैभवी घाडगे, ऋषिप्रसाद जाधव, अमोल गुडनर, अरबाज पठाण, प्रथमेश हांडे, आकाश थोरात, धिरज गिते, स्नेहल अनभूले तर इंटोनेशन रिसर्च लॅबोरेटरी मध्ये आशिर्वाद गवळी, रामकृष्ण सोडनर, नदीम शेख, सौरभ भालेराव, स्वाती शिंदे, रविंद्र देवकाटे, संदीप घोडे, संदेश कुमावत, रविंद्र बारामते, मृगनयनी पावसे, मोनाली साळुंखे, या एम.एससी. ड्रग आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री च्या वीस विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारावर निवड झाली आहे.


    महावि‌द्यालयातील प्राचार्य डॉ.आर. जे. बर्नाबस हस्ते सत्कार करून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कार्यक्रमात महावि‌द्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, उपप्राचार्य डॉ. नोयाल पारगे, उपप्राचार्य डॉ. प्रितम कुमार बेदरकर, विभाग प्रमुख डॉ. राजेश टाक सर, मार्गदर्शक प्रा. संदीप रोहोकले सर, प्लेसमेंट समन्वयक प्रा. श्रुती गुंजाळ मॅडम आदीसह रसायनशास्त्र विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.