Header Ads

Satkar: शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप

 शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप

Satkar: शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप



अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी तिचा गौरव केला.




भिंगार येथे वराडे यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी हरदिन मॉनिंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार येथील देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष किशोर भिंगारकर, स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे, पूजाचे प्रशिक्षक रमेश वाघमारे, शिरीष वराडे, रमेश वराडे, सुनीता वराडे, रत्नमाला वराडे, प्रांजली सपकाळ, संगीता सपकाळ, ज्योती पाचे, कांताबाई परदेशी, सर्वेश सपकाळ, विशाल परदेशी, बाळासाहेब सुर्यवंशी, अभिजीत सपकाळ, विशाल परदेशी, सुंदरराव पाटील, सचिन पैठणकर, अखिलेश पाचे, प्रकाश तरवडे, ईवान सपकाळ, खेडकर आदी उपस्थित होते.




आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पूजा वराडे हिने खेळात शहराचे नाव देश पातळीवर नेले आहे. ती फक्त भिंगार पुरती मर्यादीत नसून, शहराच्या दृष्टीने तिचे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावरुपास आल्यानंतर पुन्हा अभ्यासाकडे वळून तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकपदा पर्यंतची मारलेली मजल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पूजाचे वडिल रमेश वराडे व आई सुनीता वराडे यांनी केले. यावेळी संजय सपकाळ, किशोर भिंगारकर व प्रमोद मुळे यांनी आपल्या मनोगतात वराडे कुटुंबीयांचे कौतुक करुन पूजा वराडे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी देखील पूजा वराडे हिचा सत्कार केला. यावेळी सरपंच रान पानमळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पानसरे, बंटी भुजबळ, नंदकुमार भंडारे, डॉ. अय्युब खान उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.