Header Ads

Ahmednagar Khisti Samaj: लसीकरण, मोफत धान्य सर्व योजना जात, धर्म पाहून दिल्या जात नाही : पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

 डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ कोठीवर खिस्ती समाजाची  बैठक संपन्न

Ahmednagar Khisti Samaj: लसीकरण, मोफत धान्य सर्व योजना जात, धर्म पाहून दिल्या जात नाही : पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील


 


             अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकसभेचे  महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ   अहमदनगरमधील कोठी येथे कदम परिवाराच्या पुढाकारातून खिस्ती समाजाची बैठक पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थतीत  संपन्न झाली.

 

         यावेळी महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर,वसंत लोढा,अनिल शिंदे,सचिन जाधव,प्रशांत मुथ्था,माजी नगरसेवक रूपसिंग दादा कदम,विनोद कदम,शैला कदम,मा.नगरसेविका रूपाली पारगे,धर्मगुरू पास्टर दीपक थोरात, पास्टर गंगावणे मॅडम,जोसेफ पारधे आदींसह मोठया संख्नेने खिस्ती बंधू भगिनी उपस्थित होत्या  


        यावेळी वसंत लोढा म्हणाले खिस्ती समाजाचे रुपसिंग कदम यांनी नगरपालिका असताना पाठींबा दिला त्यामुळे भाजपचा पहिला नगराध्यक्ष झाला पूर्वी पासून नगरमधील समाजचे मैत्रीचे संबंध आहे अनेक ठिकाणी या समाजाने मोदींना पाठींबा दिला आहे तसा नगरमध्ये द्यावा 


        ना विखे म्हणाले मोदी सरकार जात, धर्म पाहून पाहून काम करत नाही सर्व भारतीयांसाठी काम करते, कोविड लसीकरण, मोफत धान्य,घरकुलाचा अनुदान आदी सर्व योजना हे जात, धर्म पाहून दिल्या जात नाही त्यामुळे आज सर्व समाज मोदींच्या पाठीशी उभा आहे 


          यावेळी विनोद कदम सह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली,आगरकरांनी  मनोगत व्यक्त करून खा सुजय विखेंना निवडून देण्याचे आवाहन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.