Header Ads

Ahmednagar Sports: मोबाईलपेक्षा मैदानी खेळाला महत्व द्यावे - सुवर्णा जगताप

 अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंना पारितोषिक वितरण

Ahmednagar Sports: मोबाईलपेक्षा मैदानी खेळाला महत्व द्यावे - सुवर्णा जगताप




     अहमदनगर (प्रतिनिधी )  -    आज स्पर्धेच्या युगात पालक आणि मुले अभ्यासाला मोठ्या प्रमाणात महत्व देतात. मुले दिवसभर शाळेमध्ये असतात. संध्याकाळी मोबाईल हातात असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी  पालकांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ.सुवर्णाताई जगताप यांनी व्यक्त केले.



     दि इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्यावतीने अहमदनगर येथे नुकतेच प्रशिक्षण शिबिर व बेल्ट ग्रेडेशन परीक्षा संपन्न झाली. यामध्ये अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर यशस्वीरीत्या पुढील ग्रेड प्राप्त केले. बेल्ट प्रदान कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.सुवर्णा जगताप, ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.



     पुढे बोलतांना सौ.सुवर्णा जगताप म्हणाल्या, की शहरातील विविध भागात अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होते. प्रशिक्षण केंद्राचे हे काम नक्कीच कोतुकास्पद आहे.



     खेळाडूंना अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे संचालक महेश आनंदकर, स्वाती...मॅडम, ऋषिकेश घोडेकर, शिवानी वाळके, चेतन जावळे, कल्याणी खामकर, प्रणाली कडूस, सायली कांबळे, क्रिशा चंगेडिया, रुद्राली गुंजाळ, करिष्मा जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप, जिल्हा लेबर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन विकी जगताप, उपमहापौर गणेश भोसले, ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी अभिनंदन केले.



     यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : येलो बेल्ट - रिया धानोरकर, अनया डुंगरवाल, उन्हती गांधी, अन्वी पितळे, हुमिषा कोठारी, नेत्रा गुगळे, कशिश भलगट, वैष्णवी लहरे, बलभीम परकाळे, अंकुर वनपुरे, रेयांश धानोरकर, अमृता जगताप, पार्थ आनंदकर, शौर्य कुमार, ईश्वरी राऊत, दिया छल्लानी, जान्हवी म्हसे, भार्गवी परकाळे, सिया म्हसे, ईश्वरी कसाब, रोनिका पवार, रिदिमा राठी, स्वरा चिपडे, सिद्धी पावर, राजविर दरेकर.



     ऑरेंज बेल्ट - आदित्य सांगळे, लक्षिता शिगी, प्रांजल फसले, आदित्य जगताप, विराज कुलांगे, समीर पठाण, प्रथमेश दराडे, स्वरूप चव्हाण, वेदांत खाकाळ, अविराज पगारे, श्रेया पाठक, श्रद्धा खामकर, सारा पठान, आकांक्षा आगरकर,  समृद्धी कोठारी, रिया गांधी, प्राणवी गायकवाड, मनीषा काळोसे, आर्या पांडे, सुमन सेनी, जान्हवी  येवले, देवांश गांधी.


     ग्रीन बेल्ट - अविरल दुबे, येनंझील वांधे, प्रियांशी मीना, आरव टेमकर, तनिषा धनाड,  शनया घुले, अक्षता काटे, श्रावणी काटे, ऋषिकेश नायर, विजित धतले, अविका दुबे.


     ब्लू बेल्ट - ऋषिता पाटील, हर्षित पनवर, पुवर्षण शिवण, तनिष्का जगदाळे, इशिता त्रिपाठी, सार्थक महाजन.

ब्राउन बेल्ट - श्रावणी तरटे, तेजस्विनी जाधव, श्रेयश राऊत, आदित्य भंडारी, कार्तिक ढोरे, कार्तिक पटारे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.