Header Ads

Social Work: सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी रुग्णालय वरदान - आरती खाडीलकर

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त माता-बालकांना सायंतारा - स्नेह 75 ग्रुपतर्फे फळे वाटप


Social Work: सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी रुग्णालय वरदान - आरती खाडीलकर




     अहमदनगर (प्रतिनिधी )  -    आरोग्याच्या समस्या वाढत असून, त्यावर उपचार करणारे हॉस्पिटल वाढत आहेत. एखाद्या आजारावर उपचार देखील महाग असतात. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालये वरदान ठरत आहेत, असे प्रतिपादन आरती खाडीलकर यांनी केले.



     जागतिक आरोग्य दिनानिमित्त सायंतारा ग्रुप व स्नेह 75 ग्रुपच्यावतीने जिल्हा सरकारी रुग्णालयातील माता-बालक यांना फळे, बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.अस्मिता अष्टेकर, आरती खाडीलकर, डॉ.विनोद सोळंकी, पुजा पवार, झेबा शेख, प्रमोदकुमार छाजेड, ईश्वर सुराणा आदि उपस्थित होते.



     डॉ.अस्मिता अष्टेकर म्हणाल्या, आज ही बालके उद्याची भविष्य आहेत. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत प्रत्येक माता-पित्यांचे कर्तव्य आहे. आईने आपल्या बाळाला सकस आहार देऊन आरोग्य जपावे. लहानपणीच खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्याप्रमारे लावण्यातर बालके सुदृढ होतील. सरकारी रुग्णालयात आता चांगले उपचार मिळत आहेत. त्यांचा सर्वांनी फायदा करुन घेतला पाहिजे, असे सांगितले.



     यावेळी रुग्णांनी या उपक्रमाचे स्वागत करुन सर्वांचे आभार मानले. प्रास्तविकात ईश्वर सुराणा यांनी स्नेह-75 च्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ.विनोद सोळंकी यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.