Header Ads

रामभक्त हनुमान भारतीय संस्कृतीचे प्रतिक- हभप योगिता हजारे

 गजराजनगरला हनुमान जन्मोत्सवाची किर्तन -महाप्रसादाने सांगता

रामभक्त हनुमान भारतीय संस्कृतीचे प्रतिक- हभप योगिता हजारे

रामभक्त हनुमान भारतीय संस्कृतीचे प्रतिक- हभप योगिता हजारे

    अहमदनगर (प्रतिनिधी )- प्रभु श्रीरामाचे एकनिष्ठ सेवक म्हणून श्री हनुमंतराया आहेत. या रायांनी आपले प्रभुराम-सीता आणि लक्ष्मण यांच्या सोबत राहून सेवा केली. या सेवेचे फळ हनुमंतरायांना मिळाले. आज प्रत्येक गावात मारुतीचे मंदिरे आहेत. एकवचनी, एकबाणी, एकपत्नी रामसोबत राहून सेवा केली, त्यांच्या पदरी हे पुण्य पडले. म्हणूनच ‘हे अंजनीच्या सूता तुला रामाचे वरदान’ असे म्हंटले जाते. त्यांची भक्ती ही आपल्याला प्रेरणादायी आहे, असे भागवताचार्य हभप योगिताताई हजारे यांनी किर्तनामधून सांगितले.


   गजराजनगर येथे शिवराजे मित्र मंडळ, सूर्यपुत्र प्रतिष्ठानच्यावतीने पावन हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता रात्री किर्तन व महाप्रसादाने झाली. याप्रसंगी बबलू सूर्यवंशी, दत्ता ताकपिरे, हभप शिवाजी पठारे, हभप दत्तात्रय शिंदे, संदिप परदेशी, राज आंबेकर, राकेश शिनगारे, दत्तात्रय बोराडे, शक्ती कांबळे, अतुल घाटे, कुणाल चव्हाण, अर्शद खान, तेजस कांडेकर, संकेत शिनगारे, किसन बोर्‍हाडे, साहिल कांडेकर, सनी मुसळे, अभिजित पाखरे, एकनाथ शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.


     हभप योगिताताई पुढे म्हणाल्या, हनुमान हे शक्तीशाली होते पण भक्ती देखील मोठी होती. श्रीरामांच्या भक्तीने त्यांची आपल्याला ओळख होते. रामनामाचे महत्व त्यांच्यामुळे आपण शिकलो. माणसाने फक्त संत-भगवंत यांनाच शरण जावे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्ठा ठेवून सेवा करावी. माया जवळ केली कि भक्ती दूर जाते. हनुमान आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत. त्यांची भक्ती करा, संकटे दूर होतील. रामराज्य येण्यासाठी हनुमंतरायांकडून शिकावे, असे त्यांनी सांगितले.


     यावेळी मृदूंगाचार्य कृष्णा महाराज सपकाळ, गायनाचार्य अभंग महाराज सोमवंशी यांनी किर्तनाला साथ-संगत दिली. महाप्रसादासाठी हेमंत पटेल यांचे योगदान लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजराजनगरच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.