Header Ads

माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची; निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची; निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल



अहमदनगर: रस्ते बंद करावे लागणे वाहनांच अडथळे रणरणते ऊन गावोगावी हनुमान जयंतीचे सुरू असलेले कार्यक्रम यामुळे गैरसोय टाळण्यासाठी राहुल गांधी यांना आणले नाही व साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज
असे स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी दिले जनसंवाद यात्रेच्या समारोपातच आम्ही शक्ती प्रदर्शन केले आहे असेही त्यांनी सांगितले कडून आमदार लंके यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी अंध असलेले विष्णू महाराज व सुनील क्रंजुले या दिव्यांगाच्या उपस्थितीत माजी आमदार निलेश लंके यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे,शहर प्रमुख संभाजी कदम,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला सोमवारी महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नो लंके ओन्ली विखे असे भाषण केले त्यावर प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले माझे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे डायरेक्ट संबंध आहेत मी कधीही त्यांना फोन करून बोलू शकतो त्यामुळे आमच्यात कोणी वितुष्ट निर्माण करू नये माझी लढाई धन शक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आर्थिक व राजकीय सत्तेचा गैरवापर होणार असे भाकीत मी यापूर्वीच केले होते लंकेला गुंड म्हंटले गेले पण मी गुंड आहे का? मला इंग्रजी येत नाही असेही बोलले गेले उद्या माझ्या चारित्र्यावर संशय घेणारे अस्त्र बाहेर काढतील ही निवडणूक लढविण्याची पद्धत आहे का? असा सवाल करून लंके म्हणाले मतदार संघातील दहशत संपविण्यासाठी माझी उमेदवारी आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.