Header Ads

Shivsena: शिवसेनेचं 'मशालगीत' लाँच पहा व्हिडीओ ; धगधगती पेटू दे मशाल....

शिवसेनेचं 'मशालगीत' लाँच ; धगधगती पेटू दे मशाल... 

शिवसेनेचं 'मशालगीत' लाँच ; धगधगती पेटू दे मशाल...



मुंबई - राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray ) नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) या पक्षाचा उदय झाला. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येते. त्यामुळे, दोन्ही पक्षांनी आपआपल्या चिन्हांचा प्रचार सुरू केला आहे. 


उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व कार्यकर्तेही भावूक झाल्याचं दिसून आलं. मात्र, नव्या जोमाने मशाल घेऊन उद्धव ठाकरे व शिवसेना कार्यकर्ते निवडणुकीत कामाला लागले आहेत. त्यातच, आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या मशाल गीताचे अनावरण करण्यात आले. 



राज्यातील कोट्यवधी शिवसैनिकांना ऊर्जा देणारं, कार्यकर्त्यांच्या अंगावर रोमांच आणणारं शिवसेना गीत आजही प्रत्येकाच्या ओढांवर पाहायला मिळतं. मात्र, हे शिवसेना गीत आता कोणाला गेलं, काही प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर सर्वप्रथम पोटनिवटणुकीत शिवसेनेनं मशाल गीत लाँच केलं होतं. 




आता, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्याहस्ते मशाल गीताचे अनावरण करण्यात आले. धगधगती पेटू दे मशाल.. असं हे टायटल साँग असून कार्यकर्त्यांनी घराघरात हे गीत आणि शिवसेनेचं नवं चिन्ह पोहोचविण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसेच, पोटनिवडणुकीतून विजयाची मशाल पेटली होती,अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली. 





दरम्यान, संगीतकार राहुल कानडे यांनी एक वर्षापूर्वीच हे प्रचारगीत उद्धव ठाकरेंकडे दिल होते. आता, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी नव्याने हे गीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज बनणार आहे. 


शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे

नादघोष गर्जू दे विशाल

द़ष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या

धगधगती पेटू दे मशाल


अशा शंखनाद या मशाल गीतातून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचं मशाल गीत शिवसैनिकांमध्ये स्फूर्ती व ऊर्जा जागवण्याचं काम करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.