Header Ads

Ahmednagar Loksabha Election:पहा संपूर्ण प्रचार सभा ! मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल


Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल 

Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल



अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीच्या माध्यमातून सुजय विखे पाटील यांच्याकडून नगर शहरामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे.


अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली आहे. माळीवाडा ते नवी पेठ मार्गे रॅली, चितळे रोडवरुन ही रॅली निघाली. दिल्लीगेटजवळ रॅलीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दिपक केसरकर, भाजपाचे नेते प्रविण दरेकर, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण काका जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, युवा नेते विक्रम पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित.


पहा संपूर्ण प्रचार सभा ! 

प्ले बटन क्लिक करा पुन्हा प्ले बटन क्लिक करा आणि संपूर्ण सभेचा व्हिडीओ पहा !

 





Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल




उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर खा. सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील व पत्नी धनश्री विखे पाटील यांन औक्षण केले. तसेच विजयी भव असा आशिर्वाद दिला. दरम्यान सुजय विखे पाटील माध्यमांशी बोलतांना म्हणाले. की नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता आपल्यालाच मतदान करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात केलेली विकास जनतेच्या समोर आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकेल यात शंका नाही असे ते म्हणाले.


Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल



नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका असा निरोप महसूलमंत्र्यांनी एका उद्योजकाकडून पाठवला होता, असा गोप्यस्फोट करत शरद पवार यांनी शुक्रवारी नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास होता, मग तुमच्या पक्षात दोन आमदार होते. एक तुमचे नातू (रोहित पवार) आहे, एक माजी मंत्री आहेत, तरीसुद्धा तुम्हाला बाहेरून उमेदवार घ्यावा लागतो आणि हे दोन लोक उभे राहायला तयार झाले नाही. एवढा तुमच्यात आत्मविश्वास होता, तर घरचाच उमेदवार द्यायला हवा होता. आत्मविश्वास कुणाचा डगमगलाय? याचे आत्मचिंतन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने करायचा विषय आहे, असे ते म्हणाले.



उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य मिरवणूक काढली. कार्यकर्त्यांनी डॉ. सुजय विखे यांना डोक्यावर घेत जल्लोष केला. तसेच आ. संग्राम जगताप, सचिन कोतकर यांनाही खांद्यावर घेत जल्लोष केला. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाली होती. रॅलीमध्ये विखे, जगताप, कोतकर यांच्या समर्थकांनी हाता सुजय विखे, आ. संग्राम जगताप, संदीप कोतकर यांचे बोर्ड फळकवले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.