Header Ads

Ahmednagar Sports: टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवार यांनी फडकविला तिरंगा

 

परदेशात यशस्वी झालेल्या नगरच्या पहिला महिला


Ahmednagar Sports: टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवार यांनी फडकविला तिरंगा



     अहमदनगर (प्रतिनिधी) - जगभर प्रतिष्ठेची समजली जाणारी टीसीएस लंडन मॅरेथॉन वयाच्या 46 व्या वर्षी पूर्ण करुन अहमदनगर जिल्ह्यातील प्राची संग्राम पवार यांनी ब्रिटनच्या भुमीवर तिरंगा फडकविला.


     नुकत्याच टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्राची पवार भारताचे प्रतिनिधीत्व करत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी 4 तास 58 मिनिटात तब्बल 42.197 कि.मी. अंतर धावून शर्यत पूर्ण करणार्‍या त्या नगरमधील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना एस.पी.जे. स्पोर्टस् क्लबचे संदिप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एक उद्योजिका, आई व गृहिणी अशा वेगवेगळ्या भुमिका निभवत असणार्‍या 46 वर्षीय प्राची पवार यांची ही नेत्रदीपक कामगिरी, सर्वच नगरकरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.


     यापुर्वीही प्राची संग्राम पवार यांनी 2023 मध्ये  गोवा आयर्न मॅन 70.3 ही स्पर्धा पूर्ण केली आहे. यामध्ये अहमदनगर मधील त्या पहिल्या महिला होत्या. त्याचबरोबर 2023 मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन तसेच 2024 सालची स्पर्धा ही  त्यांनी पूर्ण केलेली आहे. 


विशेष म्हणजे अहमदनगरचा भुईकोट किल्ला ते गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी असे 550 किलोमीटर अंतर त्यांनी तीन दिवसात सायकलवर पूर्ण केले आहे. असे नवनवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.


     टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवार यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.