Header Ads

Eye Camp: अंधत्व आलेल्या 70 वर्षीय हिराबाईला फिनिक्सने दिली नवदृष्टी

 

काचबिंदूची अवघड शस्त्रक्रियेने जीवन झाले पुन्हा प्रकाशमय; बिकट परिस्थितीत आजीबाईला मिळाला आधार

Eye Camp: अंधत्व आलेल्या 70 वर्षीय हिराबाईला फिनिक्सने दिली नवदृष्टी



अहमदनगर (प्रतिनिधी)- काचबिंदूने एका डोळ्यास निर्माण झालेला दृष्टीदोष तर दोन वर्षापूर्वी मोतीबिंदूने दुसऱ्या डोळ्याला ग्रासले असताना आलेल्या अंधत्वाने व आर्थिक परिस्थिती अभावी पेचात सापडलेल्या 70 वर्षीय हिराबाई काळोखे यांच्यावर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून काचबिंदू असलेल्या डोळ्याची शस्त्रक्रिया करुन त्यांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले. अंधारलेल्या जीवनाला पुन्हा दृष्टी मिळाल्याने काळोखे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.




दुष्काळी कर्जत तालुक्यातील हिराबाई काळोखे यांना दृष्टीदोष निर्माण झालेले असताना व आर्थिक परिस्थिती बेताची आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया अवघड, खर्चिक होती. त्या उपचारासाठी नागरदेवळे (ता. नगर) येथील फिनिक्सच्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झाले.



त्यांनी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांची भेट घेवून संपूर्ण परिस्थिती सांगितली. बोरुडे यांनी तात्काळ डॉक्टरांना सूचना करुन त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलला पाठविले. त्यांच्या एका डोळ्यावर काचबिंदूची अवघड शस्त्रक्रिया करुन त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम करण्यात आले.




शस्त्रक्रिया करुन काळोखे शहरात आले असता त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या जालिंदर बोरुडे यांना त्यांनी कवटाळून घेतले. या भावनिक भेटीने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवळ्या.


फिनिक्स फाऊंडेशन घेत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून अनेक दीनदुबळ्या, कामगारवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांना नवदृष्टी मिळत आहे. तर मोतीबिंदू असलेल्या दुसऱ्या डोळ्यावरही लवकरच शस्त्रक्रिया मोफत करण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.