Header Ads

Ahmednagar Loksabha Election: दोन निलेश लंके आणि डॉ सुजय विखे , डॉ परवेज उमर यांसह ३२ उमेदवारांचे अर्ज वैध

 Ahmednagar Loksabha Election: दोन निलेश लंके आणि डॉ सुजय विखे , डॉ परवेज उमर यांसह ३२ उमेदवारांचे अर्ज वैध

Ahmednagar Loksabha Election: दोन निलेश लंके आणि डॉ सुजय विखे , डॉ परवेज उमर यांसह ३२ उमेदवारांचे अर्ज वैध



अहमदनगर (प्रतिनिधी)  अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी दुरंगी लढत रंगणार होती मात्र यात एमआयएम च्या एन्ट्रीने चांगलाच धुमाकूळ घातला आणि त्यात तिरंगी लढत पहावयास मिळेल असे वाटलं असेल तर नाही दुसऱ्या निलेश लंकेचेही अर्ज वैध ठरले आहे. दोन निलेश लंके आणि डॉ सुजय विखे , डॉ परवेज उमर आणि या चार उमेदवारांसोबत ३२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत आता अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर म्हणजेच उमेदवारांना सोमवार, दि. 29 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत या ३६ उमेदवारांमधून किती अर्ज मागे घेतात आणि त्यांनतर नेमकी लढाई कोणामध्ये होईल तेही स्पष्ट होईल.


37-अहमदनगर लोकसभा मतदार संघात छाननीमध्ये 36 उमेदवारांचे अर्ज वैध तर 6 उमेदवारांचे अर्ज अवैध 

  अहमदनगर : 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असुन 6 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.


  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), शेळके विश्वजनाथ श्रीरंग (अपक्ष), पानसरे छगन भिकाजी (अपक्ष) व प्राजक्तभ प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट  कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहेत.


  नामनिर्देशन अर्ज वैध  ठरलेले उमेदवार 

 उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), विखे सुजय पाटील (भारतीय जनता पार्टी), गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ यो‍गिता प्रविण चोळके (अपक्ष), सुर्यभान दत्ताात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मरण (हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ताव प्रदीप साळुंके (इंन्सारनियत पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लीाकन पार्टी), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), 


निलेश साहेबराव लंके (अपक्ष), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्तीप पार्टी), गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष), प्रविण सुभाष दळवी (अपक्ष), मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), प्रतिक अरविंद बारसे (अपक्ष), राणी निलेश लंके (अपक्ष), 


परवेज उमर शेख (ऑल इंडिया मजलिस-इत्तेळहादुल मुस्लिमीन), कैलाश निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), भागवत धोंडीबा गायकवाड (समता पार्टी), ऍड.महंमद जमीर शेख(अपक्ष), वाबळे भाऊसाहेब बापूराव (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष), 


दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष), कोठारी रवींद्र लिलाचंद (राष्ट्रीय जनमंच एस), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र दादासाहेब शिंदे (अपक्ष), गावडे मच्छिंद्र राधाकिसन (अपक्ष) यांचा समावेश 


  उमेदवारांना सोमवार, दि. 29 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 


दि. 13 मे  रोजी 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.