Header Ads

Ahmednagar MIDC: मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्याची सांगता

 Ahmednagar MIDC: मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्याची सांगता

Ahmednagar MIDC:  मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसा व भजन संध्याची सांगता


  

             अहमदनगर (प्रतिनिधी) -मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने  आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या चे ४१ वे पुष्प मंगल भक्त सेवा मंडळ श्री दत्त क्षेत्र मंदिर,एफ ७०, एमआयडीसी,अहमदनगर येथे संपन्न झाले व गेले ४१ दिवस सलग  शहरांमध्ये विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याची आज सांगता करण्यात आलीसांगते प्रसंगी दत्त क्षेत्र परिसर सजविण्यात आला होता व आकर्षक असे व्यासपीठ व लाइटिंग करण्यात आली होती.

 



             हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात  मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष  राजाभाऊ कोठारी यांच्या उपस्तिथीत पवन फिरोदिया,संजय आंधळे,नितीन निबाळकर,प्रकाश भळगट,सुमित वर्मा,संतोष होनवाल,अन्नमय गुप्ता यांनी गाण्यातून भाविक भक्तानी मंत्रमुग्ध केले.भाविकांनी हि  सामुदायिक पठणात सहभाग घेतला.



यावेळी राजाभाऊ कोठारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले वयाच्या १७ व्या वर्षापासून  या स्थानाची सेवा करत आहे ते सलग ४० वर्षे या मध्ये कधी घराकडे लक्ष दिले नाही सर्व कुटुंब पत्नीने सांभाळले शक्ती-भक्तीजगत् उद्धाराचं अनमोल कार्य ४० वर्षापासून अखंड तेवत ठेवत आहे त्याची  प्रचिती जगभरातील भाविकांनी आलेली आहे.

 


           अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून रोज कुठे ना कुठे साऱ्या वेदनेचाचिंतेचा विसर पाडणारा अतिशय श्रवणीय असा ४१ दिवसीय हनुमान चालीसा व मजन संध्येचा कार्यक्रम चालू होता माणसाला आधी माणूस घडवता त्यांनी श्री दत्त प्रभू,  श्री शंकर महाराज यांच्या प्रेरनेनेआशीर्वादाने या शहरात सामूहिक हनुमान चालीसा पठणची साधारण २००० मध्ये सुरवात केली ,नवतरुणअबालवृद्ध सगळेच जण हळू शिकू  लागले.



खरंतर कोणत्याच गायकाला गायन येत नव्हतं.  कुणालाच काहीच येत नव्हतं पण म्हणतात ना परीस स्पर्श झाला की लोखंडचं सोनं होतं तसं  बेसुमार गळ्यांना कंठ फुटले. टाळ चिपळ्यांमधूनढोलकी तबल्यांमधून प्रभू नामाचीप्रभू प्रेमाचीप्रभू भक्तीची आळवणी सुरु झाली.व आज उत्कृस्ट असा हनुमान चालीसा मंडळ सादर करत आहे  


                     नंतर हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात  मोठ्या संख्नेने  भाविक भक्त उपस्थित होते.हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.